सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासाची प्रभावी कामगिरी; मूळ मालकांना मोबाईल परत नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात गहाळ तसेच चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी नांदेड पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सायबर पोलीस व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांनी तांत्रिक तपास आणि केंद्र शासनाच्या CEIR (Central Equipment Identity Register) प्रणालीचा प्रभावी वापर करत तब्बल ३०५ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या मोबाईलची अंदाजे किंमत ४१ लाख ३१ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा तसेच विविध भागांतून नागरिकांचे गहाळ अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांना निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मोबाईलचे IMEI क्रमांक, पोलीस अभिलेख आणि CEIR प्रणालीतील उपलब्ध माहितीची पडताळणी करून शोधमोहीम राबविण्यात आली. तांत्रिक तपासातून शोधण्यात आलेले ३०५ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांशी जोडण्यात आले. त्यानंतर २ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना मोबाईल परत सुपूर्द करण्यात आले. मोबाईल हरवल्यामुळे निर्माण झालेली आर्थिक व मानसिक अडचण दूर झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सायबरचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, सपोनि करहाळे व राठोड तसेच महिला अंमलदार शुभांगी जाधव, कांचन कसबे, सुजाता अंळदीकर आणि पोलीस अंमलदार दीपक ओढणे, विलास राठोड, मोहम्मद आसिफ, अविनाश ठोके, दाविद पिडगे, काशीनाथ कारखेडे, ज्ञानेश्वर यन्नावार, दीपक राठोड व योगेश कारामुंगे यांनी पार पाडली. मोबाईल हरवल्यास तात्काळ पोलिसांत तक्रार द्या नागरिकांनी मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. मोबाईलचा IMEI क्रमांक पोलिसांना उपलब्ध करून देऊन CEIR प्रणालीवर मोबाईल ब्लॉक/ट्रेस करण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 62 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation १.२० लाखांची लाच घेणारे दोघे पोलिस कोठडीत गांधी जयंतीला शिवतीर्थावर क्रांतीचा एल्गार! गद्दार गनू मस्ट गो च्या घोषणांनी केंद्र सरकार हादरले!