बिलोली (प्रतिनिधी) तालुक्यातील आटाकळी येथे घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 69 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 13 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आटाकळी येथील संतोष गंगाधर सूर्यवंशी हे कुटुंबासह राहत असून, 13 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या कुलपात छेडछाड करून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 69,750 रुपयांचा ऐवज चोरून चोरटा पसार झाला. या घटनेप्रकरणी संतोष गंगाधर सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे रामतीर्थ येथे गुन्हा क्रमांक 196/2026 नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 331(4), 305(अ) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ. सूर्यवंशी, मो. क्र. 7507747000 करीत आहेत. परिसरात चोरीच्या घटना वाढू नयेत यासाठी पोलिसांनी नागरिकांना रात्रीच्या वेळी घर बंद ठेवताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 124 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation माहूर तालुक्यातील वडसा येथे जुगार अड्ड्यावर सिंधखेड पोलिसांची धाड; ५ आरोपींना अटक, १ लाख ६८ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त