आदेशानुसार सिमेंट न देता रक्कमही परत केली नाही; नांदेड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – रस्ते सुधारणा प्रोग्रामअंतर्गत सुरू असलेल्या कामासाठी सिमेंट पुरवठा करण्याच्या बहाण्याने तब्बल ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना कोठा, नांदेड येथे घडली आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ईशपरीत कौर तेजेंद्रसिंघ खालसा रा. नांदेड यांनी कोठा येथे रस्त्याच्या बांधकामासाठी सिमेंटची ऑर्डर दिली होती. या ऑर्डरच्या अनुषंगाने आरोपी मनीष ईश्वरदास अग्रवाल रा.यशोविहार कॉलोनी नांदेड याच्या खात्यावर ३५ लाख रुपयांची रक्कम पाठविण्यात आली.मात्र, पैसे प्राप्त झाल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या ऑर्डरप्रमाणे सिमेंटचा पुरवठा केला नाही. तसेच दिलेली रक्कमही परत केली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं. ११९५/२०२६ अन्वये कलम ३१६(२), बीएनएस-२०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारोळे करीत आहेत. आरोपीकडून नेमकी किती रक्कम वसूल झाली, सिमेंट पुरवठा का करण्यात आला नाही आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 124 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation चार लाखांचे कॉईल ऑईल चोरीला; विमानतळ परिसरात दोन लाख २९ हजारांची रोकड हिसकावली दुचाकी अडवून तरुणावर कुऱ्हाड व लोखंडी रॉडने हल्ला