सात जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; ५० हजारांचे नुकसान करून जीवे मारण्याची धमकी माळाकोळी (प्रतिनिधी) -रिसनगाव ते आष्टूर जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी अडवून तरुणावर कुऱ्हाड व लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी माळाकोळी पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश माधवराव बाबर (वय ३३, रा. आष्टूर) हे रात्रीच्या सुमारास बुलेट दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली. यावेळी आरोपींनी फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाड व लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच त्यांच्या मोटारसायकलीचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी नारायण साहेबराव बाबर, विष्णू उर्फ मनोज साहेबराव बाबर, दिपक परसराम बाबर, परमेश्वर शेषेराव बाबर, पांडुरंग बाळासाहेब बाबर, विष्णू मारोती मोरे आणि निवृत्ती भाऊसाहेब बाबर यांच्याविरुद्ध माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सतीश बाबर यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक १२९/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०९, १८९(२), १९०, १९१(२)(३), ३५२, ३५१(२), १२६(२), ३२४ आदी कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि/हाके करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 74 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सिमेंट देण्याच्या बहाण्याने ३५ लाखांची फसवणूक गुरुग्राममधील खळबळजनक हिट अँड रन प्रकरण