बिलोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जण ताब्यात;१ लाख ७३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बिलोली (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बिलोली पोलिसांनी कासराळी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ७३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास कासराळी शिवारातील एका शेतातील मोकळ्या जागेत काही व्यक्ती गोलाकार बसून पैशांवर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती बिलोली पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिस पथकाने पंचांसह घटनास्थळी अचानक छापा टाकला. यावेळी सहा जण जुगार खेळताना आढळून आले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत घटनास्थळावरून ८ हजार ९७० रुपये रोख, विविध कंपन्यांचे सहा मोबाईल हँडसेट, तीन मोटारसायकली आणि जुगाराचे पत्ते असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ७३ हजार ९७० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.पकडलेल्या जुगाऱ्यांची नावे 1) पिराजी मारोती चरकूलवार (वय 45 वर्ष, रा. कासराळी, ता. बिलोली) 2) मन्सूर सूलेमान शेख (वय 38 वर्ष, रा. कासराळी, ता. बिलोली), 3) निळकंठ माधवराव गंगलोड (वय 42 वर्ष, रा. कासराळी, ता. बिलोली), 4) कैलास गसनाजी सूर्य (वय 40 वर्ष, रा. कासराळी, ता. बिलोली), 5) चंद्रकांत हणमंत बोडगे (वय 50 वरर्ष, रा. कासराळी, ता. बिलोली), 6) शेख जावेद शेख सलीम (वय 37 वर्ष, रा. कासराळी, ता. बिलोली) अशी आहेत.

या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली पोलिसांच्या पथकाने केली. जिल्ह्यात अवैध जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू असून, अशा अवैध हालचालीं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!