
पथनाट्यातून भ्रष्टाचाराचे वास्तव मांडले जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड समोर एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक आणि GenZ (युवा पिढी) विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्याद्वारे शासकीय आणि निमशासकीय विभागांमध्ये सर्वसामान्य जनतेला कोणत्या प्रकारे लाचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यावर काय उपाययोजना कराव्यात, याचे जिवंत सादरीकरण करण्यात आले. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून युवा पिढीला मार्गदर्शन पथनाट्य सादरीकरणानंतर एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शिक्षक श्री. जोशी सर आणि GenZ विद्यार्थ्यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी तरुणांशी संवाद साधून त्यांना समाज परिवर्तनासाठी आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी मार्गदर्शन केले.
नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास किंवा एखाद्या लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. लाचेबाबत तक्रार करणाऱ्या किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असेही या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
संपर्क साधण्यासाठी माहिती:
- टोल फ्री क्रमांक: १०६४
- लाप्रवि नांदेड युनिट: ९२२४८४८९९९ / ८९५६५०९०६४
- ईमेल: dyspacbnanded@mahapolice.gov.in
भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन लाप्रवि नांदेड युनिटतर्फे करण्यात आले आहे.
