नानांच्या आठवणींना उजाळा नानांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली: मान्यवरांच्या भावना नांदेड (प्रतिनिधी)- अभिनयाच्या पडद्यावर अर्थात ‘रील’ लाईफमध्ये असंख्य व्यक्तिरेखा जागवणारे आणि पडद्याबाहेर ‘रिअल लाईफ’ दुःखितांच्या वेदनांशी नाते जोडणारे अभिनेते नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा देत नांदेडकरांनी कृतज्ञता व्यक्त केली. दैनिक ‘गोदातीर समाचार’ कार्यालयात श्रद्धांजली/ कृतज्ञता सभा घेण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. नानांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या माणूसपणाचा आणि शेतकरी व समाजासाठी उभ्या केलेल्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार या सभेत अनेकांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, ही सभा कोणतीही औपचारिकता न ठेवता कृतज्ञतेचे समान व्यासपीठ म्हणून घेण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक संपादक केशव घोणसे पाटील यांनी केले. सभेला विधानपरिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार हेमंत पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, संपादक शंतनू डोईफोडे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश महामंत्री प्रणिताताई देवरे चिखलीकर, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, माजी सनदी अधिकारी तथा अभिनेते अनिल मोरे, शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, डॉ. दत्ता मोरे, सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, योग गुरु सिताराम सोनटक्के, विजय येवनकर, उद्योजक मारोती कंठेवाड, विसावा ग्रुपचे बालाजी इबितदार, श्याम वडजे पाटील, सुनील कदम मरळककर, दशरथ कपाटे, सार्थक पाचभाई, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, पंडित पवळे, डॉ. सान्वी जेठवाणी, भाऊसाहेब मोरे, प्राचार्या ज्योतकौर पहाडिया, विजय होकर्णे, संदीप सोनकांबळे, नगरसेवक प्रतिनिधी महेंद्र देमगुंडे, कॉ. गंगाधर गायकवाड, चौधरी, संजय कोठाळे, साहेबराव गजभारे, अशोकराव कांबळे, कवित्रीय रूपाली वागरे, साहित्यिक सोनू दरेगावकर, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, पोलीस निरीक्षक राजेश पुरी, नागेश चौधरी, विश्वंभर पवार, आयुब पठाण, दत्तात्रय कांबळे, कुलदीप नंदुरकर, संतोष कुलकर्णी, डी. एम. पांडागळे, विजय कामिनवार, दीपक महालिंगे, गजानन हिंगमिरे, सुनील सुनपे, गणेश आंबेकर, रवी ढगे, अशोक कुंटूरकर, एड. गंगाधर सावळे, सारंग नेरलकर, करणसिंह बैस, नरेंद्र गडप्पा, ज्ञानेश्वर सुनेगावकर, गोधाजी खेडेकर, अमरप्रीतसिंग जज, डॉ. दिनेश भुतडा, विकास भोसीकर, डॉ. भंडारी, भैय्यासाहेब गोडबोले आदी अनेकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक संपादक केशव घोणसे पाटील यांनी केले. यावेळी संपादक शंतनू डोईफोडे, प्रणिताताई देवरे चिखलीकर, दिलीप पाटील बेटमोगरेकर, अनिल मोरे, गुणवंत पाटील हंगरगेकर, डॉ. दत्ता मोरे, शिवाजीराव कपाळे, योग गुरु सिताराम सोनटक्के गुरुजी, श्याम पाटील वडजे, बालाजी इबितदार, भाऊसाहेब मोरे, कॉ. गंगाधर गायकवाड, संजय कोठाळे, नागनाथ आयलाने, नागेश चौधरी, विजय होकर्णे, कुलदीप नंदुरकर आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविकात केशव घोणसे पाटील यांनी नानांशी जोडलेल्या कार्याच्या आठवणी सांगताना, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो’ या भावनेतून नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी २०१५ मध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी मदतकार्य उभे केल्याचे त्यावेळच्या आठवणी जागवल्या. सप्टेंबर २०२५ साली नांदेड जिल्ह्यातील २५० कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपये मदत देण्यासाठी नांदेडमध्ये आलेल्या नाना पाटेकर यांनी गोदातीर समाचार कार्यालयात घेतलेल्या बैठकीचे घडलेल्या प्रसंगांची आठवण सांगितली. त्यानंतर २०२२ मध्ये दीडशे कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत, जलसंधारणाची कामे करण्यात आली. अशा विविध माध्यमातून शेतकरी आणि शेतीपूरक गोष्टींसाठी नानांचे कार्य आर्थिक मदतीपलीकडे जाऊन माणुसकीची भिंत उभारण्याचे होते, अशा शब्दात त्यांनी नानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी नानांनी शेतकरी आणि जवान या दोन्ही घटकांप्रती कृतीतून कृतज्ञता व्यक्त केल्याचे सांगत, नानांच्या पश्चातही जिल्ह्यात ‘नाम’चे कार्य अखंड सुरू ठेवणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे नमूद केले. संपादक शंतनू डोईफोडे यांनी नानांच्या अचूक वेळेच्या भानाचा संदर्भ देत, अभिनयातील प्रत्येक कामाची वेळ त्यांनी साधली; मात्र आयुष्यातील एक्झिट मात्र चुकीच्या वेळी झाली,अशी भावस्पर्शी प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असताना नानांच्या कार्याची गरज अधिक भासत असल्याचेही त्यांनी सांगितले. समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था सक्षम करण्याची गरज त्यांनी मांडली. अनिल मोरे यांनी, “अभिनय त्यांचा व्यवसाय होता; समाजसेवा ही त्यांची आवड होती आणि पुढे तीच जीवनध्येय बनली,” असे सांगत नानांच्या व्यक्तिमत्त्वाचे सार मांडले. आकाशाएवढी उंची मिळालेल्यांनी या मातीतील माणसांना खांद्यावर घेण्याची संवेदना जपावी, हा नानांच्या जीवनाचा संदेश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नाना सोबतच्या जुन्या आठवणी सांगितल्या. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी कंधार- लोहा तालुक्यातील ५० गावांचा गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार उपक्रमात समावेश झाल्याचे सांगितले. जलसंधारण, वृक्षारोपण आणि शेती सक्षम करून आत्महत्या रोखण्याचा नानांचा व्यापक विचार पुढे नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात अनेकांनी नानांना शब्दरूपी श्रद्धांजली वाहिली. भाऊसाहेब मोरे यांनी बँकांनी आपल्या निधीतून काही हिस्सा शेतकरी कल्याणासाठी द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीसोबतच मुलांचे शिक्षण आणि महिलांच्या प्रश्नांनाही आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. कृतज्ञता सभेचे सूत्रसंचालन गझलकार बापू दासरी यांनी केले. नानांच्या आठवणींनी भारावलेल्या या सभेचा केंद्रबिंदू शोक नव्हता, तर नानांनी पेटवलेली सामाजिक संवेदनशीलतेची ज्योत पुढे नेण्याचा सामूहिक संकल्प हा होता. या कार्यक्रमासाठी गोदातीर समाचार परिवारातील आशुतोष घोणसे पाटील, प्रल्हाद कांबळे, मनोहर कदम, दीपक पुयड, रमेश चित्ते, प्रा. अमृत जाधव, रमेश ठाकूर, बालाजी वट्टमवार, किरण वाठोरे, पुष्पा कुलकर्णी, जळबा लखे आदींनी नियोजन केले. Kanthak Suryatal Post Views: 71 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ