नांदेड (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड विभागातील प्रवाशांना पंढरपूरला जाण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे: • गाडी क्रमांक 07631 नगरसुल – पंढरपूर ही विशेष गाडी शुक्रवार, 24 जुलै 2026 रोजी नगरसुल येथून सायंकाळी 19.00 वाजता सुटेल आणि रोटेगाव, लासूर, छत्रपती संभाजीनगर , जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी मार्गे पंढरपूरपर्यंत येथे शनिवारी दुपारी 12.50 वाजता पोहोचणार आहे. • गाडी क्रमांक 07632 पंढरपूर – जालना ही विशेष गाडी शनिवार, 25 जुलै 2026 रोजी पंढरपूर येथून रात्री 20.00 वाजता सुटेल आणि कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर मार्गे जालना येथे रविवारी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. • गाडी क्रमांक 07633 आदिलाबाद – पंढरपूर-मिरज ही विशेष गाडी शुक्रवार, 24 जुलै 2026 रोजी आदिलाबाद येथून सकाळी 05.00 वाजता सुटेल आणि किनवट, बोधडी बुजरुग, सहस्त्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, हरंगुळ, धाराशिव, पांगरी, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, मोडनिंब, पंढरपूर येथे शनिवारी रात्री 21.40 वाजता पोहोचेल तसेच पुढे सांगोला, जत रोड, कवठेमहांकाळ, आरग मार्गे मिरज येथे रात्री 23.55 वाजता पोहोचेल. • गाडी क्रमांक 07634 मिरज-पंढरपूर – आदिलाबाद ही विशेष गाडी शनिवार, 25 जुलै 2026 रोजी मिरज येथून रात्री 21.30 वाजता सुटल आणि आरग, कवठेमहांकाळ, जत रोड, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, पांगरी, धाराशिव, हरंगुळ, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्त्रकुंड, किनवट मार्गे आदिलाबाद येथे रविवारी दुपारी 15.00 वाजता पोहोचेल. • गाडी क्रमांक 07635 अकोला – पंढरपूर ही विशेष गाडी शुक्रवार, 24 जुलै 2026 रोजी अकोला येथून शुक्रवारी सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तापूर, वाडी, कलबुर्गी, सोलापूर, कुर्डुवाडी, मोडनिंब मार्गे पंढरपूर येथे शनिवारी 09.20 वाजता पोहोचेल. • गाडी क्रमांक 07636 पंढरपूर – अकोला शनिवार, 25 जुलै 2026 रोजी पंढरपूर येथून दुपारी 15.50 वाजता सुटेल आणि मोडनिंब, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, चित्तापूर, सेरम, तांदूर, विकाराबाद, झहीराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम मार्गे अकोला येथे रविवारी दुपारी 16.50 वाजता पोहोचेल. दक्षिण मध्य रेल्वेने आषाढी एकादशी यात्रेसाठी प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 332 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation न्यायदात्यावरच बंदुकीचा धाक; पण पोलिसांना ॲट्रॉसिटीचे वावडे? कायद्याच्या रक्षकच जेव्हा भक्षकांचे तारणहार बनतात! जेव्हा ३ इडियट्सचा खरा हिरो मृत्यूशी झुंज देतो… अमित शाह यांचे कॅल्क्युलेशन चुकले का?