नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने एका धाडसी कारवाईत घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ४,१४,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईचा तपशील: गुन्हे शोध पथकाचे पोउपिन विनोद देशमुख आणि त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, श्री. शाहू महाराज पुतळा परिसरात काही संशयित व्यक्ती फिरत आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन इसमांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम आढळली, ज्याबद्दल त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. सुरुवातीला त्यांच्यावर भाग्यनगर पोलीस ठाण्यात एन.सी. क्रमांक ५०७/२०२६ कलम १२४ मपोका प्रमाणे कारवाई करण्यात आली.
गुन्ह्याची कबुली: संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायण नगर येथे चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्डची पाहणी केली असता, त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९१/२०२६, कलम ३३१(१), ३३१(२), ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(a) बी.एन.एस. नुसार गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
अटक करण्यात आलेले आरोपी: १) विशाल सुनिल कऱ्हाळे (वय २५ वर्ष, रा. नारायणनगर, नांदेड) २) सुगंध संजय पाईकराव (वय २२ वर्ष, रा. तेहरानगर, नांदेड) ३) मगद मुकुंदराव वाघमारे (वय २५ वर्ष, रा. वामनदादा कडकनगर, नांदेड)
जप्त केलेला मुद्देमाल:
- नगदी रोकड: २,१०,०००/- रुपये
- सोन्याचे दागिने (४ ग्रॅम): ५१,५००/- रुपये
- चांदीचे दागिने (२१ ग्रॅम): ३,१००/- रुपये
- गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल: १,५०,०००/- रुपये
-
- तपास पथक: ही यशस्वी कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि पोलीस उप अधीक्षक (शहर) रामेश्वर वैजंने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश माळी, पोउपिन विनोद देशमुख, पोउपिन नरेश वाडेवाले, पोलीस अंमलदार विशाल माळवे, विष्णूकांत मुंडे, सुधाकर मलदोडे, राजीव घुले, नागनाथ चापके, राहुल लाटकर, आदनान पठाण आणि अंकुश कांबळे यांचा समावेश होता.
