नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध गुटखा विक्रेत्यावर धडक कारवाई करत 70 हजार 842 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व वाहनासह मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 8 जुलै रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने न्यायदनगर परिसरातील शिवम टी हाऊस येथे छापा टाकला. यावेळी रजू पांडुरंग कांघोरे (वय 34, रा. कांघोरवाडी, ता. कंधार) हा शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व पानमसाल्याची विक्री करत असल्याचे आढळून आले.छाप्यात आरोपीच्या ताब्यातील एमएच-26 बीएन-1245 क्रमांकाच्या ऍक्टिव्हा दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला प्रतिबंधित गुटखा, पानमसाला तसेच वाहन असा एकूण 70 हजार 842 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 845/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274 व 275 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी राम बारहाते, शेख गफ्फार, तेलंग, पवार आदींच्या पथकाने केली.दरम्यान, जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन, अवैध दारू, जुगार, गुटखा आदी बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 707 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड हादरले! भंगार वेचून पोट भरणाऱ्या वृद्धाची मुलानेच खून करून संपवली जीवनयात्रा अवैध गुटखा-पानमसाला विक्रीवर वजिराबाद पोलिसांची कारवाई; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त