नांदेड – शिख धर्माचे सहावे धर्मगुरू श्री हरगोविंद साहिबजी यांच्या ४३१ व्या जयंती निमित्त दि.२५जून ते ३०जून दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गुरू ग्रंथ साहिबजी, श्रीदसम ग्रंथ साहिब जी, श्री सरबलोह ग्रंथ साहिबजी श्री चौपई साहिबचे पाठ होणार आहे. नगरकिर्तनाने कार्यक्रमांचा समारोप होणार आहे, अशी माहिती हजुरी साथ संगत व हजुरी क्रांती सघटनांचे अध्यक्ष मनप्रीत सिंघ कुंजीवाले यांनी दिली आहे.
गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, समुह पंजप्यारे साहिब यांच्या आशीर्वादाने व बाबा नरिदंरसिंघजी व बाबा बलविंदर सिंघ लंगर साहिब (कार सेवा वाले) व माता साहिब देवाजीचे जत्थेदार बाबा तेजासिंघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरू हरगोविंद साहिब यांच्या जंयतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सहाववे गुरु हरगोविंद साहिबजी यांची जयंती २४ जून रोजी साजरी करण्यात येत आहे. त्या निमित्ताने फतेह सिंघजी मंगल कार्यालय अबचल नगर कॉलनी येथे सात दिवस दर रोज कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुपारी ३.३० ते ५ वाजेपर्यंत सुखमनी साहिबचा पठण आणि रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत श्री गुरु हरगोबिंद साहिब यांचे जीवनचरित्र, कथाकार, ज्ञानी सरबजीत सिंग निर्मले आणि ज्ञानी नाहर सिंघ हे सादर करणार आहेत. दररोज कथेच्या नंतर सायंकाळी ९ ते ९.३० पर्यंत नाम सिमरणचे पाठ होणार असून त्यानंतर लंगर प्रसादाचे आयोजन केले आहे. दि. २५जून व २६ जून रोजी सकाळी ११ वाजता गतका प्रतियोगिता व दि. २७ जून ते २८ जूनपर्यंत चेस प्रतियोगिताचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३०जून रोजी सप्ताह पाठच्या समाप्ती होईल. या कार्यक्रमांना सर्व साथ संगतने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रम व लंगर प्रसादाचा लाभघेऊन महाराजांचे आशिवार्द प्राप्त करावेत, असे आवाहन हजुरी क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.