नवीन नांदेड (प्रतिनिधी)- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानमित्त हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला. उपस्थितांना यावेळी साखर वाटप आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी सिडको हडको परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील एक सुवर्णकाळ आणि महत्वाचा प्रसंग. ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. या राज्याभिषेकामुळे मुघल आणि इतर परकीय सत्तेचा अधीन असलेल्या भारतात एक स्वतंत्र व सार्वभौम हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. या ऐतिहासिक दिनानिमित्त हडको येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सिडको नगरसेवक संजय पाटील घोगरे , वैजनाथ देशमुख, नगरसेवक प्रतिनिधी राजू लांडगे, सतीश बस्वदे तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेश रायेवार, डॉ. अशोक कलंत्री, डॉ. विजयानंद भोंग, डॉ. अशोक भिसे, भगवान ताटे, साहेबराव गाडे, जयवंत काळे, संजय इंगेवाड, आनंदराव गायकवाड, संदीप कदम, प्रमोद मैड, देविदास बस्वदे, धीरज स्वामी, बापू पाटील, शिराळे देवराव, साहेबराव मोरे,गजानन शिंदे, विनोद कांचनगिरे, सुदर्शन कांचनगिरे यांच्यासह व्हाईस ऑफ मीडिया दक्षिण नांदेड पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संभाजी सोनकांबळे, सचिव शिवाजी राजुरकर, कोषाध्यक्ष दिगंबर शिंदे (डिगा पाटील), सहसचिव सुरेश आंबटवार यांची उपस्थिती होती.
