नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड अभिवक्ता संघाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त हॉल क्रमांक ४४ येथे अभिवादन व पुष्पहार अर्पण करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अँड. डी. के. हांडे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकार वकील अँड. रणजित देशमुख उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये सचिव अँड. कपिल पाटील व उपाध्यक्ष अँड. संगमेश्वर देलमाडे सर अॅड कोषाध्यक्ष मंगेश जामनिक सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कपाळे सर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, त्याग, सामाजिक कार्य व त्यांना झालेल्या काळा पाण्याची शिक्षेबद्दल प्रेरणादायी विचारांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. उदय बडगे यांनी उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रमास अँड. उमेश मेगदे, अँड. सोनारीकर , अँड. माळाकोळीकर, ॲड. अमित डोईफोडे , ॲड नितीन कागणे , ॲड माणिक वाखरडे, अँड अनिल पाटील, ॲड संजय वाकोडे, ॲड अनुप पांडे , अँड समीर कासराळीकर तसेच अभिवक्ता संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच वकील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 505 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड एटीएस प्रकरणातील पंजाबच्याआरोपीला जामीन २४ आरोपींवर मकोका लागू