नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील वाढत्या संघटित गुन्हेगारीविरोधात नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन गंभीर गुन्ह्यांतील २४ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लागू केला आहे. या कारवाईमुळे नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. भाग्यनगर व विमानतळ पोलीस ठाण्यांनी ही कारवाई केली. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ एप्रिल २०२६ रोजी कॅनॉल रोड परिसरात दोन गटांतील वर्चस्वाच्या वादातून तिहेरी हत्येची घटना घडली होती. तसेच विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ एप्रिल २०२६ रोजी गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले होते. या गुन्ह्यांतील आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी संघटित पद्धतीने गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात दीपक अर्जुन पवार, रोहित प्रकाश खिल्लारे, आकाश गोविंदराव लुळे, पप्पू उर्फ लालबा शेषराव गजलवाड, राजेश अंकुश पवार, अविनाश नारायण चव्हाण, रोशन सुरेश हळदे, प्रशिक उर्फ परश्या दिलीप ओढणे, चंद्रशेखर उर्फ चंद्या देवराव पाईकराव, सोहेल उर्फ चिंधी फेरोजखान पठाण, मोहम्मद तोफीक शेख संदलजी, साईसिंग उर्फ साईलाला दीपकसिंग गहेरवार, जयकुमार उर्फ सोनू कैलास राऊत, शाकेर खान रशीद खान, शेख शाहरुख उर्फ कबुतर शेख अजगर, शेख उबेद शेख अजगर, दिग्विजय गणेशराव नारागुडे, मन्मथ वसंतराव मंगरुळे, नितेश परमेश्वर इंगळे, गौरव दीपकसिंग गहेरवार, सय्यद आवेज सय्यद खलील (मयत), महंमद अरबाज महंमद फारुख (मयत),इलियासउर्फ काला इल्लुखान इस्माईलखान आणि शेख शाहरुख उर्फ हंटर शेख जाफर या आरोपींचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने दोषारोपपत्रांची दखल घेतल्यानंतरही आरोपींच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याचे दिसून आले. जामिनावर सुटल्यानंतर आरोपी पुन्हा संघटित होऊन गंभीर गुन्हे करत असल्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांनी २८ मे २०२६ रोजी संबंधित तीनही गुन्ह्यांमध्ये MCOCA लागू करण्यास मंजुरी दिली. अंतर्गत पुढील काळातही सराईत गुन्हेगारांवर MPDA, MCOCA आणि हद्दपारसारख्या कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,609 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation साहेबराव गुट्टे नांदेडचे पोलीस उप अधीक्षक मुख्यालय .. आता आर. के. लक्ष्मण यांचा तो कॉमन मॅन आज मरणासन्न अवस्थेत .. आता फक्त नागरिकांची गाढवी सहनशक्तीच देशाला वाचवू शकते