नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मुद्दखेड व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीच्या दोन वेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. एका प्रकरणात शाळेतील शिक्षक पदाच्या बनावट नियुक्तीद्वारे १ लाख ९० हजार २५८ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे, तर दुसऱ्या प्रकरणात आयसीआयसीआय बँकेत नोकरी लावून देण्याच्या खोट्या आश्वासनावरून ५ लाख ५० हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे. पहिली घटना (गुन्हा क्रमांक ९४/२०२६, पो.स्टे. मुदखेड) दिनांक १० फेब्रुवारी २०१८ ते १९ मे २०२६ या कालावधीत मुदखेड येथील अब्दुल कलाम उर्दू हायस्कूलमध्ये आरोपींनी संगणकाचा वापर करून शालेय समितीची बनावट बैठक दाखवली व खोटी कागदपत्रे तयार केली. याद्वारे आरोपी क्रमांक ५ असलेल्या आसमा बेगम खाजामिया यांना शिक्षक पदावर नियुक्त केल्याचे दिसून येते. मात्र, त्या व्यक्तीने कोणतीही सेवा न देता संस्था आणि शासनाकडून १ लाख ९० हजार २५८ रुपयांचा मोबदला घेतला. याप्रकरणी फिर्यादी शेख मैनोदीन शेख फरीद (वय ७०, रा. रेल्वे स्टेशन मुदखेड) यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS-2023) कलम ३१८(४), ३१६(२), ३१६(५), ३३८, ३३६(३), ३४०(२), ६१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.या प्रकरणात इतर आरोपींची नावे मुजीब अहेमद अमोरोद्दीन अंसारी, नुसरत फातेमा सय्यद विकार हाशमी खान,वाजिद अहेमद अमोरोद्दीन अन्सारी,जावेद अहेमद अमोरोद्दीन अन्सारी अशी आहेत. दुसरी घटना (गुन्हा क्रमांक २२२/२०२६, पो.स्टे. शिवाजीनगर) दिनांक १ एप्रिल २०२६ ते १९ मे २०२६ या दरम्यान नविन मोढा, नांदेड येथे राहणाऱ्या फिर्यादी कृष्णा नागनाथ गोपीवार (वय ४१, रा. विष्णुनगर, नांदेड) यांना आरोपींनी आयसीआयसीआय बँकेत नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन दिले. या बदल्यात त्यांच्याकडून ५ लाख ५० हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी आरोपी एम.ए. सिद्दीकी (रा. नागपूर) व सुभाष बाबुराव नरवाडे (रा. गोविंदनगर, नांदेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा BNS-2023 च्या कलम ३१८(४) व ३(५) अंतर्गत नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उप निरीक्षक कदम करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या बनावट आश्वासनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. Kanthak Suryatal Post Views: 974 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बॉम्बे उच्च न्यायालयाकडून राज्यातील जिल्हा न्यायाधीशांसह ९०२ न्याधीशांच्या बदल्या जाहीर सहायक पोलीस अधीक्षकांनी अवैध वाळू वाहतुकीतील तीन टिप्परसह 1 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल जप्त