नायगाव (प्रतिनिधी) – नायगाव पोलिसांनी वाळू वाहतूक करणाऱ्या तीन टिप्पर वाहनांवर कारवाई करत तब्बल १ कोटी ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी वाहनांसह सुमारे १२ ब्रास वाळू हस्तगत केली. प्राप्त माहितीनुसार, दि. १९ मे २०२६ रोजी पहाटे १.५४ वाजण्याच्या सुमारास मांजरम बसस्थानकाजवळ गस्तीवर असताना पोलिसांना कोलंबीकडून येणारी तीन टिप्पर वाहने (नंबर: MH-04-HY-6481, MH-46-AF-3200 व MH-03-CP-7224) आढळून आली. त्यामध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक करण्यात येत होती. चालकांना विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणताही परवाना किंवा कागदपत्रे नसल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तातडीने तिन्ही वाहने व त्यातील वाळू जप्त केली. जप्त मालाचे तपशीलवार मूल्य खालीलप्रमाणे: · टिप्पर क्र. १ (MH-04-HY-6481) अंदाजे किंमत ₹२० लाख + २ ब्रास वाळू अंदाजे ₹१० हजार · टिप्पर क्र. २ (MH-46-AF-3200) अंदाजे किंमत ₹४० लाख + ५ ब्रास वाळू अंदाजे ₹२५ हजार · टिप्पर क्र. ३ (MH-03-CP-7224) अंदाजे किंमत ₹४० लाख + ५ ब्रास वाळू अंदाजे ₹२५ हजार अशा एकूण १ कोटी ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले आहे: १. प्रताप पंडीतराव मोरे (वय ३२, रा. टाकळी बु., ता. नायगाव) २. योगेश बळीराम दापरवाड (वय २०, रा. मारतळा, ता. लोहा) ३. अक्षय रावसाहेब बने (वय २२, रा. हातनुर, ता. लोहा) नायगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक १२१/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कार्यवाही शाम पानेगावकर (उपविभागीय पोलिस अधिकारी, बिलोली) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी पोलिस निरीक्षक शशांत एन.एम. (भापोसे) यांच्या निर्देशानुसार सपोउपनि सोपान तुकाराम वळगे, पोकॉ नारायण नंदेवार, पोकॉ ज्ञानेश्वर पुणेबोईनवाड या पथकाने ही कारवाई केली. तपास सहायक पोलिस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर करत आहेत. पोलिसांनी नागरिकांमध्ये असा संदेश दिला आहे की, अवैध खाण व वाहतूक व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. Kanthak Suryatal Post Views: 225 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शिक्षक पदाच्या बनावट नियुक्तीत १ लाख ९० हजारांची फसवणूक; तर बँक नोकरीच्या आमिषाने ५.५ लाखांचा गंडा नांदेड पोलीस परिक्षेत्रात अवैध व्यवसायावर कारवाईचा भडिमार; ५६ गुन्हे, १.२३ कोटींचा मुद्देमाल जप्त