नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील पाकिजा फंक्शन हॉलसमोर पोलीस असल्याचे भासवून दोन अज्ञात भामट्यांनी एका ज्येष्ठ व्यापाऱ्याची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १४ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी दामोदर हनुमानदास जाजू (वय ६१, रा. सिद्धीधाम अपार्टमेंट, नांदेड) हे रस्त्याने जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. संबंधितांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत परिसरात चोरीच्या घटना वाढल्याचे कारण पुढे केले. त्यांनी दामोदर जाजू यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातातील अंगठी सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने काढून घेण्यास सांगितले. दागिने पिशवीत ठेवत असल्याचे नाटक करून भामट्यांनी ते स्वतःकडेच ठेवले आणि क्षणात तेथून पसार झाले.या फसवणुकीत अंदाजे ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३१९(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांना आवाहन : पोलीस असल्याचे सांगून कोणीही दागिने किंवा मौल्यवान वस्तू काढण्यास सांगितल्यास तत्काळ ओळखपत्राची खात्री करून जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,278 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई;अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर धडक; 39.55 लाखांचा मुद्देमाल जप्त जिल्ह्यात 16 मेपासून जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात;नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले