धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी

भोकर – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले सुपुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. अवघ्या ९ वर्षांच्या शासनकाळात त्यांनी १२० हून अधिक लढाया लढल्या आणि एकही लढाई न हरता औरंगजेबाच्या अवाढव्य सैन्याला टक्कर दिली. त्यांच्या असीम त्याग आणि धर्मरक्षणासाठी त्यांना ‘धर्मवीर’ म्हटले जाते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आज जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर येथे मा. डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच सर्वांनी अभिवादन केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ ज्योती यन्नावार, डॉ अपर्णा जोशी, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, लिपिक प्रल्हाद होळगे, अधिपरिचारिका साधना सगत, श्रीमती डवरे, हत्तीरोग कर्मचारी गजानन कंकाळ, संजय धुमाळे, गणेश गोदाम आदी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!