नांदेड- येथील सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने दिला जाणारा केळुसकर गुरुजी प्रेरणा पुरस्कार माध्यमिक शिक्षक रणजित गोणारकर यांना जाहीर झाला आहे. गोणारकर यांची शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक तथा सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन गेली पंचवीस वर्षे कार्यरत असलेल्या सत्यशोधक विचारमंचाने त्यांची निवड केली आहे. निवडीचे पत्र मंचाचे अध्यक्ष कोंडदेव हाटकर यांनी दिले. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, २१ व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, संयोजन समितीचे नागोराव डोंगरे यांची उपस्थिती होती. शहरात जून महिन्यात होणाऱ्या २१ व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात रणजित गोणारकर यांना मान्यवरांच्या हस्ते सदरील पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, शाल, ग्रंथ, मानचिन्ह, सन्मानचिन्ह, गौरवपत्र असे राहणार आहे, असे संयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. रणजित गोणारकर हे उमरी तालुक्यातील बळेगाव येथे कृष्णाई माध्यमिक विद्यालयात कार्यरत आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान उमरी व सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गोणारकर यांचे अभिनंदन केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 961 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दोन व्यक्तीं कडून १ लाख १९ हजारांचा विदेशी दारूसाठा जप्त तीन जुगार अड्ड्यांवर छापे; १७ आरोपींना ताब्यात; ६ लाख ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त