नांदेड, दि.८ (प्रतिनिधी)-नांदेडच्या होलिसिटी पब्लिक स्कूल पासदगाव ता.जि.नांदेड या शाळेची विद्यार्थिनी श्रध्दा दिपक बार्हाळीकर हिने शाळेत पहिला क्रमांक मिळवित ९९ टक्के गुण प्राप्त केले असून, तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बालपणापासून अत्यंत हुशार आणि चाणाक्ष तसेच मेहनती विद्यार्थिनी म्हणून श्रध्दाची ओळख आहे. सातवीपासूनच तिने ९० टक्क्याच्यावर गुण घेवून आपले शैक्षणिक कसब दाखवले होते. दहावीच्या परिक्षेचा निकाल लागल्यानंतर तिने ९९ टक्के गुण प्राप्त केले असून, होलिसिटी पब्लिक स्कूलमध्ये तिने सर्वाधिक गुण घेवून पहिला क्रमांक पटकाविला आहे. शाळेचे प्राचार्य महंमद अर्शद, उपप्राचार्य सुजाता नाईक, वर्ग शिक्षिका रश्मी यंदे, संस्कृत शिक्षिका वर्षा माळवदकर, सुनिल पाटील, रिना पार्डीकर, सिता जोशी यांचे तिला मार्गदर्शन मिळाले. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत असून, सततचा नियमित अभ्यास, शाळेत दिलेल्या सूचनांचे पालन आणि नियमितच्या होमवर्कचा पाठपुरावा यामुळे तिने हे यश संपादन केले. दैनिक सामना कार्यालयातील दिपक बार्हाळीकर यांची ती मुलगी असून, आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडील आणि गुरुजनांना दिले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
श्रध्दा दिपक बार्हाळीकर हिचे दहावी परिक्षेत यश, होलिसिटी पब्लिक स्कूलमध्ये पहिला क्रमांक मिळवत घेतले ९९ टक्के गुण
