भोकर (प्रतिनिधी) – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांनी दाखल केलेल्या गु.र.न. 22/2014 या प्रकरणात अभियंता पदावर कार्यरत असलेल्या तुकाराम आनंदराव चौतमल यांना न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदर प्रकरण स्पेशल केस क्रमांक 04/2014 असून आज दिनांक 08 एप्रिल 2026 रोजी माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद नसिर मोहम्मद सलीम यांनी निकाल दिला.
प्रकरणाची माहिती
तक्रारदार अशोक गंगाधर सोळंके, मुख्याध्यापक, जि.प. प्रा. शाळा ताटकळवाडी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सर्व शिक्षा अभियानांतर्गत मंजूर झालेल्या एका खोलीच्या बांधकामाच्या 18,900 रुपयांच्या शिल्लक धनादेशाकरिता आरोपी अभियंता तुकाराम चौतमल यांनी प्रथम 5,000 रुपये लाचेची मागणी केली होती. लाच मागणी पडताळणी दरम्यान तडजोडीनंतर 2,500 रुपये रक्कम निश्चित झाली व आरोपीने त्यापैकी 1,500 रुपये स्वीकारल्याचे सिद्ध झाले.