भोकर (प्रतिनिधी) – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांनी दाखल केलेल्या गु.र.न. 22/2014 या प्रकरणात अभियंता पदावर कार्यरत असलेल्या तुकाराम आनंदराव चौतमल यांना न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरण स्पेशल केस क्रमांक 04/2014 असून आज दिनांक 08 एप्रिल 2026 रोजी माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद नसिर मोहम्मद सलीम यांनी निकाल दिला. प्रकरणाची माहिती तक्रारदार अशोक गंगाधर सोळंके, मुख्याध्यापक, जि.प. प्रा. शाळा ताटकळवाडी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सर्व शिक्षा अभियानांतर्गत मंजूर झालेल्या एका खोलीच्या बांधकामाच्या 18,900 रुपयांच्या शिल्लक धनादेशाकरिता आरोपी अभियंता तुकाराम चौतमल यांनी प्रथम 5,000 रुपये लाचेची मागणी केली होती. लाच मागणी पडताळणी दरम्यान तडजोडीनंतर 2,500 रुपये रक्कम निश्चित झाली व आरोपीने त्यापैकी 1,500 रुपये स्वीकारल्याचे सिद्ध झाले. न्यायालयाचा निकाल लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 तसेच 13(1)(D) सह 13(2) अंतर्गत आरोपी दोषी ठरला. न्यायालयाने खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. कलम 7 : 1 वर्ष सक्तमजुरी व 5,000 रुपये दंड कलम 13(1)(D) सह 13(2) : 1 वर्ष सक्तमजुरी व 5,000 रुपये दंड,एकूण 1 वर्ष सक्तमजुरी व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा आरोपीस सुनावण्यात आली. तपास व न्यायालयीन प्रक्रिया या प्रकरणात 06 साक्षीदारांची सविस्तर तपासणी करण्यात आली. प्रारंभिक तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक भीमराव शिंगाडे स्टार केस निरीक्षक : पोलीस निरीक्षक रसूल तांबोळी सरकारी वकील : सौ. अनुराधा डावखरे अंमलदार पोलीस अंमलदार वैशाली पुंडगे व पोलीस अंमलदार बाबुराव सावळे लाच स्वीकारल्याचे आरोप न्यायालयात सिद्ध झाल्याने अभियंता तुकाराम चौतमल यांना शिक्षा सुनावण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 815 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ईरान, इजरायल और अमेरिका महायुद्ध में युद्ध विराम करने के लिए जो श्रेय पाकिस्तान को मिल रहा है उससे विश्वगुरु नरेंद्र मोदी वंचित रहे -किशोर तिवारी दिव्यांग सचिव तुकाराम मुंढे यांची बदली त्वरित रद्द करा…. सकल दिव्यांग संघटनेची राज्य शासनाकडे मागणी