तिरुपती यार्ड येथे पुलाच्या रूपांतरण कामांमुळे काही गाड्यांचे तात्पुरते मार्गांतर

दक्षिण मध्य रेल्वेने तिरुपती (TPTY) यार्ड येथे सुरू असलेल्या अभियांत्रिकी कामांमुळे काही गाड्यांच्या धावणीत तात्पुरते बदल जाहीर केले आहेत. तिरुपती यार्ड येथे किमी 103/38-40 वर असलेल्या ब्रिज क्र. 154 चे Pipe Type वरून Box Type मध्ये रूपांतरण करण्याचे काम करण्यात येत आहे. हे काम रेल्वे पायाभूत सुविधांची क्षमता व सुरक्षितता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

या कामासाठी सक्षम प्राधिकरणाने 27 एप्रिल 2026 ते 02 मे 2026 या कालावधीत प्रत्येकी 6 तासांचे एकूण 6 ट्रॅफिक ब्लॉक्स घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे या कालावधीत काही गाड्यांचे मार्गांतर (Diversion) करण्यात येणार असून काही स्थानकांवरील थांबे तात्पुरते रद्द राहतील.

गाड्यांचे मार्गांतर

गाडी क्र. 16733 रामेश्वरम – ओखा एक्सप्रेस ही गाडी 01 मे 2026 रोजी कटपडी – मेलपक्कम – रेनिगुंटा मार्गे वळविण्यात येईल. त्यामुळे या दिवशी तिरुपती (TPTY) येथे या गाडीचा थांबा राहणार नाही.

तसेच गाडी क्र. 07605 तिरुपती – अकोला विशेष गाडी ही गाडी 01 मे 2026 रोजी तिरुपती – रेनिगुंटा –गुत्ती मार्गे वळविण्यात येईल. या कालावधीत पाकाला, पिलेर, मदनपल्ले रोड, मालकालचेरुवू , कादिरी, धर्मावरम, अनंतपुर या स्थानकांवरील थांबे राहणार नाहीत.

प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित गाडीची अद्ययावत माहिती तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर रेल्वे पायाभूत सुविधा अधिक सक्षम व सुरक्षित होण्यास मदत होणार असून रेल्वे संचालन अधिक कार्यक्षम होईल. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दक्षिण मध्य रेल्वेला खेद असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!