मुंबई (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यभरातील विविध जिल्हा व सत्र न्यायालयांमधील २१ विधी अधिकाऱ्यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणली आहे. यामध्ये ४ जिल्हा सरकारी सरकारी अभियोक्ता आणि १७ सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचा समावेश आहे. त्याच वेळी, शासनाने राज्यभरातील ३७३ विधी अधिकाऱ्यांना १४ ऑक्टोबर २०२६ पासून पुढील ६ महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरती मुदतवाढ दिली आहे. ४ जिल्हा सरकारी अभियोक्ता आणि १७ सहाय्यक अभियोक्त्यांची सेवा समाप्त अधिसूचनेनुसार सेवा समाप्त करण्यात आलेल्या चार प्रमुख जिल्हा सरकारी अभियोक्त्यांमध्ये बीडचे ॲड. अजय दिनकरराव राख, लातूरचे ॲड. संतोष वसंतराव देशपांडे, परभणीचे ॲड. ज्ञानोबा उमाजीराव दराडे आणि सोलापूरचे ॲड. प्रदिपसिंग मोहनसिंग रजपूत यांचा समावेश आहे. या चारही जिल्ह्यांचा अतिरिक्त कार्यभार अनुक्रमे बीड येथे ॲड. भागवत सुखदेव राख, लातूर येथे ॲड. शिवकुमार माधवप्पा गिरवलकर, परभणी येथे ॲड. सालापूरकर मयुर पद्माकरराव आणि सोलापूर येथे ॲड. आनंद गोपाळ कुर्डूकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यांच्यासोबतच विविध जिल्ह्यांतील इतर १७ सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: अहमदनगर: ॲड. अशोक लक्ष्मणराव बहाणे बुलढाणा: ॲड. सुभाष पुंडलिक हिवाळे व ॲड. रजनी देवीदास बावस्कर धुळे: ॲड. पराग मधुकर पाटील, ॲड. गणेश यशवंत पाटील व ॲड. अजयकुमार शंकरराव सानप जालना: ॲड. दिपक नारायणराव कोहले लातूर: ॲड. सय्यद गोसपाशा चाँदपाशा नागपूर: ॲड. खापर्डे रश्मी प्रविण, ॲड. मोठघरे माधुरी कमलाकर व ॲड. घाडगे लिलाधर बळवंत परभणी: ॲड. घाटे बाबासाहेब बाळासाहेब हिंगोली: ॲड. नायक नितीन हनुमंतराव पुणे: ॲड. प्रदिप जगदिश गेहलोत रत्नागिरी: ॲड. पुष्कराज शशािकांत शेट्ये सांगली: ॲड. अनिलकुमार नागेशराव कुलकर्णी सातारा: ॲड. राजेंद्र चिमणलाल शहा जिल्हा निहाय मुदतवाढ मिळालेले विधी अधिकारी दुसऱ्या आदेशानुसार, शासनाने राज्यभरातील ३७३ विधी अधिकाऱ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. यामध्ये मुंबई सत्र न्यायालयात सर्वाधिक २९, नागपूर २७, पुणे २६, अहमदनगर २०, अमरावती, औरंगाबाद व कोल्हापूर येथे प्रत्येकी १६, नाशिक १५, बीड, जळगाव, सोलापूर, यवतमाळ व ठाणे येथे प्रत्येकी १४ आणि लातूर येथे १३ विधी अधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळाली आहे. तसेच बुलढाणा व सांगली येथे प्रत्येकी १०, अकोला, धाराशिव, रायगड व वाशिम येथे प्रत्येकी ८, मुंबई नगर दिवाणी न्यायालय ७, चंद्रपूर व परभणी येथे प्रत्येकी ६, गोंदिया, जालना, नांदेड व नंदुरबार येथे प्रत्येकी ५, हिंगोली व वर्धा येथे प्रत्येकी ४, भंडारा, धुळे व गडचिरोली येथे प्रत्येकी ३ आणि सिंधुदुर्ग येथे २ विधी अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढ मिळालेल्या प्रमुख जिल्हा सरकारी वकिलांमध्ये अहमदनगरचे ॲड. सतीश पाटील, अकोल्याचे ॲड. राजेश्वर रमेश देशपांडे, अमरावतीचे ॲड. परिक्षित शरद गणोरकर, औरंगाबादचे ॲड. अविनाश सूर्यकांतराव देशपांडे, भंडाराचे ॲड. विनोद बलवंत भोले, चंद्रपूरचे ॲड. प्रशांत गजानन गड्डूवार, धुळ्याचे ॲड. देवेन्द्रसिंह योगेंद्रसिंह तंवर, गडचिरोलीचे ॲड. अनिलकुमार सुकुरुजी प्रधान, गोंदियाचे ॲड. महेश सच्चानंद चांदवानी, कोल्हापूरचे ॲड. विवेक हरिभाऊ शुक्ला, नागपूरचे ॲड. तेलगोटे नितीन आत्माराम, नाशिकचे ॲड. अजय सुहास मिसर, रायगडचे ॲड. संतोष सखाराम पवार, साताराचे ॲड. महेश नारायण कुलकर्णी, वर्धाचे ॲड. गिरीष वसंतराव तकवाले आणि यवतमाळच्या ॲड. निती नवनीत दवे यांचा समावेश आहे.नांदेड जिल्ह्यात जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड.रणजित नरसिंगराव देशमुख,सहायक सरकारी अभियोक्ता ॲड.यादव प्रकाश तळेगावकर,ॲड.संदीप भीमराव कुंडलवाडीकर,ॲड.महेश भगवानराव कागणे,ॲड.मीनाकुमारी अप्पाराव बतुल्ला (डांगे) यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. हे आदेश उप विधी सल्लागार-नि-उप सचिव सुभाष लक्ष्मण फुले यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेले आहेत. सर्व मुदतवाढ मिळालेल्या विधी अधिकाऱ्यांच्या भविष्यातील कामगिरीसाठी वास्तव न्यूज लाईव्ह च्या वतीने शुभकामना. राज्यभरातील अभियोक्ताची यादी वाचकांच्या सोई साठी जोडली आहे …. ज_िल्हा व_िध_ि अध_िकारी मुदतवाढीबाबत-13.10.2026 Kanthak Suryatal Post Views: 66 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दिल्लीत खाकीची गुंडगिरी की आणीबाणी? राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत उघड झालेला पोलीस छळाचा भयानक थरार! तिरंगा फडकवणे हा आता गुन्हा ठरलाय का?