घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा सुरू केला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, या खुनाच्या अवघ्या 24 तासांपूर्वीच ई स्क्वेअर परिसरात दोन आणि रुग्णालयात एक असे तीन खून झाले होते. त्यामुळे सलग घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. टोळ्यांमधील जुने वाद, वर्चस्वाची लढाई किंवा सूडभावना या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासणे, संशयितांची चौकशी आणि परिसरातील गुन्हेगारी हालचालींचा मागोवा घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. अवघ्या 24 तासांत चौथा खून झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.यातील काही मारेकऱ्यांनी स्वःत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असल्याची माहिती खात्री लायक सूत्रांनी दिली आहे.
