दिल्ली-भारताचे सरन्यायाधीश डॉ.डी.वाय.चंद्रचुड यांनी सर्वोच्च न्यायालयात दुसऱ्या एका न्यायमुर्तींच्या घरी स्वयंपाकी असलेल्या व्यक्तीच्या मुलीचा सन्मान सर्वोच्च न्यायालयाच्या लंच लाऊंजमध्ये बोलावून तिचा केलेला सन्मान हा भारतासाठीच नव्हे तर जगासाठी एक आदर्श आहे. या बालिकेने आपल्या कर्तत्वावर 50 हजार डॉलरची शिष्यवृत्ती प्राप्त करून भारतासाठी जो आदर्श तयार केला. त्या आदर्शाचा सन्मान न्यायमुर्ती डॉ.चंद्रचुड व सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायमुर्तींच्या उपस्थितीत करण्यात आला. फोटोत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांच्याबरोबर दिसते ती मुलगी आहे प्रज्ञा. तिचे अभिनंदन करण्यासाठी चंद्रचूड यांनी आज १३ मार्च, २०२४ रोजी मुद्दाम सुप्रीम कोर्टातील लंच लौंजमध्ये तिला तिच्या आई वडिलांसह जेवणास बोलावले होते. सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायाधीश या जेवणास आणि प्रज्ञाचे अभिनंदन करण्यास हजर होते. असा सन्मान मिळणारी ही प्रज्ञा आहे तरी कोण? सुप्रीम कोर्टातील एका अन्य न्यायाधीशांच्या घरी कुक असलेल्या एकाची प्रज्ञा ही मुलगी. हुशार आणि आजूबाजूला कायद्याचे वातावरण. त्यामुळे विधी पदवीधर झाली. मग सुप्रीम कोर्टाच्या रीसर्च आणि प्लॅनिंग सेंटरमध्ये विधी संशोधक म्हणून संधी मिळाली. त्या अनुभवावर आणि हुषारीवर ती विधी क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेतील सहा विद्यापीठात पात्र ठरली आहे. कोलंबिया, पेनिंसिल्व्हनिया, शिकागो, न्यूयॉर्क, बरकले आणि मिशिगन ही ती विद्यापीठे. मिशिगन विद्यापीठाने तिला वार्षिक ५० हजार डॉलरची शिष्यवृत्तीसुद्धा देऊ केली आहे. यापैकी एक विद्यापीठ निवडून ती लवकरच अमेरिकेस जाईल. अश्या गुणी मुलीचे अभिनंदन! Kanthak Suryatal Post Views: 1,685 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शनिवार व रविवारी नांदेडचा ग्रंथोत्सव ग्रंथ प्रदर्शन व विविध कार्यक्रमांचेआयोजन ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा संघ उत्कर्ष-२०२४ स्पर्धेसाठी जळगाव येथे रवाना