नांदेड येथे ३ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान शिवकालीन अस्सल सुवर्ण होन,प्राचीन नाणी व पुरातन शस्त्र, आयुधे यांचे प्रदर्शन नांदेड (प्रतिनिधी)- येथील जुन्या नांदेड मधील ऐतिहासिक नंदगिरी किल्ला येथे दि.३ एप्रिल ते दि.५ एप्रिल २०२६ या कालावधीत छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेल्या शिवकालीन सुवर्ण होन, प्राचीन नाणी व पुरातन शस्त्रे व आयुधे यांचे आगळे वेगळे अभिनव प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सांगलीचे भूमिपुत्र व येथील अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव त्यांच्या अभिनव संकल्पनेतून नांदेडचे प्राचीन व ऐतिहासिक वैभव असलेल्या नंदगिरी किल्ल्याचे जतन व संवर्धन करणारी नंदगिरीचे किल्लेदार यांची एक मोठी फौज तयार झाली आहे. सदर किल्लेदार व नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील प्राचीन व ऐतिहासिक वैभव असलेला दुर्मिळ ठेवा यांचे सर्वांना दर्शन व्हावे व जाज्वल्य इतिहास डोळ्यासमोर उभा राहावा यासाठी या अभिनव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी सोन्याचे होन हे नाणे प्रचलित केले होते. त्या पैकी एक अस्सल सुवर्ण होन (सुवर्ण नाणे) हा ऐतिहासिक अमूल्य ठेवा अशोकसिंघ ठाकूर यांनी संग्रहित केलेला असून त्याचे दर्शन दि. 3 एप्रिल रोजी सर्वांना घडणार आहे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा एखाद्या किल्ल्यावर अशा पद्धतीने वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन भरत आहे. श्री चक्रधर संग्रहालय,निलंगा (लातूर) यांनी संग्रहित केलेल्या इसवी सन पूर्व ६०० पासूनची दुर्मिळ नाणी यांचे प्रदर्शन तसेच महाराष्ट्र व कर्नाटकातील ऐतिहासिक असलेल्या १२ किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन दि.४ एप्रिल रोजी सर्वांना पहावयास मिळणार आहे. नंदगिरीवर गेल्या तीन वर्षांपासून अशा पद्धतीचे प्रदर्शन भरत आहे. यामध्ये प्रथमच सुवर्ण होनचा समावेश आहे.या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार व नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 721 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये बीएड सीएटी परीक्षेत मोठा गोंधळ;विद्यार्थीनींनी केला रास्ता रोको;बैठक व्यवस्था व इंटरनेट बिघाडामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान पळवून अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोघांनाअटक; उस्माननगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई