नांदेड (प्रतिनिधी)- शहरात खंडणी आणि घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.या प्रकरणात राष्ट्रवादी पक्षाचे नेते जीवन घोगरे पाटील यांचे नाव आरोपी सदरात आहे. एसआयटी ची मागणी आता चांगलीच महागात पडल्याचे दिसत आहे. वजीराबाद परिसरात खंडणी प्रकरण दि. 18 सप्टेंबर 2025 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत कोर्ट परिसर, वजीराबाद येथे चार जणांनी संगनमत करून फिर्यादीची बनावट स्वाक्षरी करून खोटे कागदपत्र तयार केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीला धमकावत 17 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी आनंद प्रेमचंद भारुट रा. नागपूर, राष्ट्रवादी नेते जीवन आबाजीराव घोगरे, सिद्धार्थ सुखदेव भाकरे आणि संदीप साहेबराव नवघडे रा. नांदेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री शांतिलाल जैन (वय 58, रा. बाफना रोड, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,057 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई – फरार दोन खुनी आरोपींना अटक शिवाजीनगरमध्ये घरफोडी; 1.35 लाखांचा मुद्देमाल लंपास