नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई – फरार दोन खुनी आरोपींना अटक

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीविरोधात पोलिसांची सजगता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 109/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींनी जुन्या वादातून संगनमत करून तक्रारदारावर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात तलवार, काठी आदी शस्त्रांचा वापर करून गंभीर जखमा करण्यात आल्या होत्या.

घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. पोलिस उप अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे वडगाव शिवारात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.या कामगिरीत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर,पोलीस उप निरीक्षक व्यंकट कुसमे,पोलीस अंमलदार वसंत केंद्रे,शेख इब्राहिम,विनोद पवार,मारोती पंचलिंग,समीर अहमद,शंकर माळगे,धम्मपाल कांबळे,सचिन चावरे,शिवानंद कानगुले यांनी सहभाग घेतला.  अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शिवकुमार सोहेवराव पुठवड (वय २८) व चंद्रकांत गणेश सुपे (वय ३०) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!