नांदेड – राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मिशन लक्षवेध हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत नागपूर विभागास ॲथलेटिक्स व टेबल टेनिस या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरु करण्यास मान्यता मिळालेली आहे. या विभागीय क्रीडा निपुणता केंद्र अंतर्गत अथलेटिक्स व टेबलटेनिस या खेळांच्या क्रीडा प्रकारची खेळाडू निवड चाचणीचे आयोजन २५ मार्च २०२६ या कालावधी मध्ये विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड मानकापूर, नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. खेळाडू निवड चाचणी कार्यक्रम खालीलप्रमाणे अथलेटिक्स या खेळासाठी २५ मार्च २०२६ व दिनांक व वेळ कालावधी २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता इनडोअर हौंल विभागीय क्रीडा संकुल कोराडी, रोड मानकापूर, नागपूर. (श्रीमती इशिता रॉय, क्रीडा मार्गदर्शक) ६२०६४३८५८८ यांच्याशी संपर्क साधावा. टेबलटेनिससाठी (कालावधी २५ मार्च २०२६ ) व वेळ व कालावधी २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता इनडोअर हौंल विभागीय क्रीडा संकुल कोराडी, रोड मानकापूर, नागपूर (सुदर्शन मेसरे, क्रीडा मार्गदर्शक) ९९८८२३०६७८ याप्रमाणे आहे. मिशन लक्षवेध योजना अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग नागपूर येथील विभागस्तरीय क्रीडा निपुणता केंद्र अंतर्गत स्थापित होणाऱ्या निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्रासाठी खेळाडूंनी निवड चाचणी साठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे सोबत आणायची आहेत. जन्मदाखला, शाळा/महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र शाळा बोनाफाइड प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत २ वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटोग्राफ 3 इ. खेळाडूंनी निवास व भोजन व्यवस्था स्वतः करावयाची असून नागपूर विभागस्तरीय निपुणता केंद्राच्या निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्राकरिता निवड चाचणीचे आयोजन २५ मार्च २०२६ रोजी उपरोक्त नमूद ठिकाणी आवश्यक त्या साहित्यासह उपस्थित राहावे. (अधिक संपर्कासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावे) श्रीराज बलोदे क्रीडा अधिकारी (९८६०२०२२८५) गौरव जोशी क्रीडा अधिकारी (९६६५४७४८२५) स्वप्नील बनसोड क्रीडा अधिकारी(९८२२६८२६३९) निशांत पाटील राज्य क्रीडा मार्गदर्शक(९९२११११५५८) Kanthak Suryatal Post Views: 558 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे — इतवारा पोलिसांचा गुटक्यावर ‘वैद्यकीय’ चमत्कार! नलिनी उमरीकर यांचे निधन