भाग्यनगर पोलिसांकडून संन्याशाला अटक;अमिश दाखवून लैगिक शोषणाचा आरोप ;  सध्या पोलीस कोठडीत 

नांदेड (प्रतिनिधी)- जगभरात एप्सटिन फाईलची चर्चा सुरूच आहे. नासिक शहत असाच एक भोंदू बाबा पकडल्या गेल्यानंतर नांदेड शहरात धक्कादायक प्रकार समोर आला असून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेच्या तक्रारीवरून ३८ वर्षीय संन्याशाला भाग्यनगर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाग्यनगर परिसरातील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संत बाळगीर महाराज मठ, गोदावरी नदीजवळ राहणारे हरी गीर दत्त गिर गिरी महाराज (वय ३८) यांनी त्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. मात्र, नंतर महिलेनं लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्यांनी आपण संन्यासी असल्याचे सांगत लग्न करण्यास नकार दिला. तसेच, हे प्रकरण मांडवली करण्यासाठी पैसे घेण्यासाठी दबाव व धमक्या दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९,३५१ (२) प्रमाणे गुन्हा क्रमांक १५७/२०२६ असा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनात  सहायक पोलीस निरीक्षक अनुसया केंद्रे  यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, भाग्यनगर पोलिसांनी आरोपी संन्यासी हरी दत्तगिर गिरी महाराज याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.न्यायालयाने गिरी महाराजाला एक दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!