नांदेड परिसरात कारवाई करत जुगार अड्डा व अवैध रेती वाहतूक प्रकरणात एकूण सुमारे 32 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला नांदेड (प्रतिनिधी)-मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 14 मार्च 2026 रोजी हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगाधर ईदगांव यांच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत 27 हजार रुपयांची रोकड, 4 मोबाईल आणि 3 मोटारसायकली असा सुमारे 1 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पथकाने भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर व ब्रास रेतीसह सुमारे 30 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम 303 (2), (3), (5) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 32 लाख 6 हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई पोलिस उप निरीक्षक पंकज इंगळे यांच्या पथकाने केली असून पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ,कामाजी गवळी आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, 16 मार्चपासून 30 मार्चपर्यंत जिल्ह्यात गुन्हा विरोधी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या मोहिमेत अवैध दारू, जुगार, मटका, गुटखा विक्री तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून 91 50 100 100 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 780 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हक्काच्या पैशांसाठी झगडताना कर्मचाऱ्याचा अंत ; नांदेडच्या एमजीएम कॉलेजमध्ये स्व. सुनील कुलकर्णी यांची वेदनादायक कहाणी मराठी भाषा अस्मितेचा श्वास – प्रा. मा. मा. जाधव