रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार जगभर जुम्मा तुल विदा म्हणून ओळखला जातो. 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडली. त्या क्रांतीनंतर इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खोमेनी यांनी हा दिवस इंटरनॅशनल कुद्स डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसापासून हा दिवस पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ जगभर पाळला जातो.
काल शुक्रवार होता. त्याच दिवशी अनेक बाजूंनी मोठमोठ्या धमक्या देण्यात आल्याआज इराणवर असे हल्ले करू, तसे हल्ले करू अशा घोषणा करण्यात आल्या. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही व्हिडिओद्वारे आक्रमक वक्तव्य केले. काही पाश्चिमात्य माध्यमे आणि संस्थांच्या ट्विटमध्येही हल्ल्यांच्या धमक्या दिल्या गेल्या.
परंतु या सगळ्या धमक्यांनंतरही इराणी जनता आपल्या ध्येयापासून मागे हटली नाही. कोट्यवधी लोक इराणच्या रस्त्यांवर उतरले. अमेरिका आणि इस्रायलने हल्ल्यांचे सावट निर्माण केले, काही ठिकाणी स्फोटांचे आवाजही झाले; तरीही ही सर्वसामान्य जनता मागे सरकली नाही. युद्धाच्या नियमांनाही पायदळी तुडवत अशा परिस्थितीत हल्ले झाले, पण जनतेची इच्छाशक्ती ढळली नाही.
महिला, मुले आणि वृद्ध यांच्यासह लाखो-कोट्यवधी लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कुद्स डे निर्धाराने साजरा केला. लोकांना घाबरवण्यासाठी आसपास स्फोट घडवले गेले, वातावरण दहशतीचे करण्याचा प्रयत्न झाला; पण लोक भीक घालत बसले नाहीत. त्यांनी आपल्या उद्देशासाठी ठामपणे रस्त्यावर येऊन हा दिवस साजरा केला.
दोन व्हिडिओ विशेष चर्चेत आहेत..
एका व्हिडिओमध्ये इराणमधील एक पत्रकार त्या घटनांची थेट रिपोर्टिंग करत असताना जवळच स्फोट होतो, तरीही तो शांतपणे रिपोर्टिंग सुरू ठेवतो. दुसऱ्या बाजूला इस्रायलमधील एका पत्रकाराजवळ स्फोटाचा आवाज होताच तो आणि त्याची टीम घाईघाईने तिथून पळून जातात. आजच्या परिस्थितीत इराण आणि इस्रायलमधील मानसिकतेतील हा स्पष्ट फरक आहे.
आज इराण-इस्रायल संघर्ष समजून घेणे सोपे नाही. कारण युद्ध केवळ गोळ्या-बारुद आणि शस्त्रांनी जिंकले जात नाही; युद्ध जिंकण्यासाठी माणसांच्या मनात हिम्मत आणि जिद्द असावी लागते. आणि ती जिद्द इराणच्या लोकांनी दाखवून दिली आहे.
युद्धविरामाच्या चर्चा सुरू असतानाही इराण स्पष्ट सांगत आहे
जोपर्यंत आमच्या अटी मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही युद्ध थांबवणार नाही.
इराणी नेतृत्व म्हणते, आमचे नुकसान झाले तर आम्ही शत्रूंना त्यापेक्षा जास्त नुकसान सहन करायला भाग पाडू. इराणकडे असलेले संवेदनशील युरेनियम साठे पर्वतांच्या आत, जमिनीखाली खोलवर सुरक्षित ठेवलेले आहेत. त्या साठ्यांपर्यंत पोहोचेल अशी प्रचंड क्षमता असलेली मिसाईल आजही जगात फारच कमी आहेत.
काही महिन्यांपूर्वीही हल्ले झाले होते. त्या वेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की इराणची सर्व अणुस्थळे नष्ट केली आहेत. जर खरोखर ती नष्ट झाली असती, तर त्याचा परिणाम इराणच्या जनतेवर स्पष्ट दिसला असता. पण तसे काहीही झालेले दिसले नाही. याचा अर्थ प्रत्यक्षात परिस्थिती तितकी गंभीर नव्हती; काही मर्यादित नुकसान झाले असेल, पण निर्णायक काही घडले नाही.
आता अमेरिकेच्या गुप्तचर संस्थादेखील मान्य करत आहेत की इराणमध्ये सत्ताबदल घडवून आणणे सोपे नाही. तरीही जगातील अनेक प्रसारमाध्यमांनी आणि भारतातील काही माध्यमांनी सतत प्रचार केला की इराणकडे आता कोणतीही ताकद उरलेली नाही.
पण प्रत्यक्षात ड्रोन आणि मिसाईलच्या समन्वयाने केलेल्या हल्ल्यांनी इस्रायल आणि अमेरिकेला मोठे आव्हान दिले आहे. काल शुक्रवारपर्यंत इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाचा चौदावा दिवस होता. युद्ध जिंकण्याची खरी इच्छा असेल, तर ती लोकांच्या मनात दिसते.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी काल वक्तव्य केले की इराणचे नेते बंकरमध्ये लपून बसले आहेत. पण वास्तव काही वेगळेच चित्र दाखवत होते. 13 मार्च रोजी इंटरनॅशनल कुद्स डे साजरा होत असताना इराणचे राष्ट्रपती पेजेयान्स्की स्वतः रस्त्यावर जनतेमध्ये होते. ते लोकांना भेटत होते, हस्तांदोलन करत होते, सेल्फी काढत होते. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराची देखील लाखो लोकांसोबत रस्त्यावर चालत होते, पत्रकारांशी बोलत होते, मुलाखती देत होते त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. इराणचे वरिष्ठ सुरक्षा नेते अली लारी जानी, ज्यांच्या डोक्यावर इस्रायली गुप्तचर संस्थेकडून बक्षीस घोषित असल्याची चर्चा आहे, तेही निर्धास्तपणे जनतेमध्ये फिरत होते आणि पत्रकारांशी संवाद साधत होते.
दुसऱ्या बाजूला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू युद्ध सुरू झाल्यानंतर फक्त एका रुग्णालयात भेट देताना दिसले. त्यानंतर त्यांचे बहुतेक संदेश व्हिडिओद्वारेच येत आहेत; ते स्वतः सार्वजनिक ठिकाणी फारसे दिसत नाहीत.
यालाच म्हणतात आत्मविश्वासाची ताकद जेथे जनता आणि नेतृत्व दोघेही भीतीशिवाय रस्त्यावर उभे असतात.
