नांदेड (प्रतिनिधी)- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.नांदेड़ शहरात आता छोट्या होटल्स चवणाऱ्यानां लवकरच आपला व्यवसाय बंद करावा लागणार आहे, कारण आता व्यावसायिक सिलेंडर १८०० रुपयाना खरेदी करण्याची त्यांची ताकत नाही.
दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, महिला तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांवर मोठा आर्थिक ताण येत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांवर गॅस दरवाढीचा अतिरिक्त भार टाकू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत असताना केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करून जनतेवर आर्थिक भार टाकल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. पूर्वी गॅस सिलिंडर सुमारे ४०० रुपयांमध्ये उपलब्ध होत होता, मात्र आता त्याची किंमत सुमारे ९०० रुपयांपर्यंत पोहोचली असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे घरगुती अर्थकारण कोलमडले आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. दरवाढीमुळे शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच लहान व्यावसायिकांवर मोठा परिणाम होत असून हॉटेल व्यवसाय आणि इतर व्यवसायिकांना जास्त दराने सिलिंडर घ्यावे लागत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रारही आंदोलकांनी केली.
हे आंदोलन खासदार रवींद्र आनंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार, महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार अब्दुल गफ्फार, नगरसेवक बाबुभाई खेकेवाला, नगरसेवक शेख पाशा, नगरसेवक सय्यद शौकत, नगरसेवक प्रा. अँड शहाबाज, नगरसेवक मोहसिन खान, नगरसेवक सत्यपाल सावंत, नगरसेवक प्रा. काशीनाथ नाफे, नगरसेवक एम. इब्राहिम, नगरसेविका ज्योती गोविंदे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस सुरेंद्र देढजकर, डॉ. श्रावण रेपनवाड, तिरुपती पप्पू कोंडेकर, कार्याध्यक्ष तिरुपती कोंडेकर, महेश देशमुख, बाळाजी चव्हाण, कोषाध्यक्ष मुन्ना अब्बास, कार्याध्यक्ष दीपक हुझुरिया, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार, ब्लॉक अध्यक्ष संजय वाघमारे, आनंद गुंडले, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे, सेवादल उपाध्यक्ष गणेश ढगे, जिल्हा अध्यक्ष सुरेश हटकर, उपाध्यक्ष गगन यादव, केदार पाटील साळुंके, लोहा तालुकाध्यक्ष मधुकर दिघे, उमरी तालुकाध्यक्ष राजू पाटील बोलसेंकर, माजी नगरसेवक शेर अली, विधानसभा अध्यक्ष अंबादास राठोड, जिल्हा प्रवक्ता सुभाष लोणे, अधिवक्ता मुन्ना देशमुख, हदगावचे श्यामराव मनाठकर, एनएसयूआयचे गोविंद पाटील, नंदकिशोर देशमुख, बाळासाहेब देशमुख, रमेश चिते, संजय कोटेकऱ, आनंद कल्याणकर, नागराज सुतळेकर, प्रतापराव देशमुख, बाबुराव गाडे, शिवानंद देवळे, शरीफ बी. एन., मंगलाळे गीता शिरसागर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच वाढलेले गॅस दर तात्काळ कमी करावेत, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
