नांदेड ( प्रतिनिधी ) सदाशिवराव पाटील यांच्या स्मरणार्थ सदाबहार फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आणि अभिमानाची बाब आहे, अशी भावना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक व दैनिक रिपब्लिकन गार्डचे मुख्यसंपादक विजयदादा सोनवणे यांनी व्यक्त केली. पुरस्कार स्वीकारताना बोलताना सोनवणे म्हणाले की, दलित पँथरच्या चळवळीत काम करत असताना माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना समाजातील विविध घटकांमधून मोठा आधार मिळाला. विशेषतः सदाशिवराव पाटील यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाने आम्हाला खंबीर साथ दिली आणि सामाजिक कार्यासाठी प्रेरित केले.ते पुढे म्हणाले की, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला भरभरून साथ दिली समाजातील या विश्वासामुळेच काही प्रमाणात कार्य करता आले आणि समाजासाठी योगदान देता आले. हा पुरस्कार त्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा आहे. या शानदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने सामाजिक कार्याची जबाबदारी अधिक वाढल्याची भावना देखील विजयदादा सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केली. सदाशिवराव पाटील यांच्या स्मरणार्थ सदाबहार फाऊंडेशनच्यावतीने दिल्या जाणारा जीवनगौरव व कार्यकर्ता पुरस्कार प्रदान सोहळा सायन्स महाविद्यालयाच्या पुरणमल लाहोटी सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. पंडितराव देशमुख हे तर प्रमुख पाहुणे म्हणून सीए डॉ. प्रविण पाटील हे होते. यावेळी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे यांना जीवन गौरव तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक व दैनिक रिपब्लिकन गार्डचे मुख्यसंपादक विजयदादा सोनवणे, उपप्राचार्य अशोक सिद्धेवाड यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.यावेळी बोलतांना डॉ. व्यंकटेश काब्दे म्हणाले की, मी एका निरक्षर कुटुंबात जन्माला आलो. माझ्या कुटुंबातला मी पहिला उच्चशिक्षित असलो तरी आता माझे सर्व कुटुंब, आप्तेष्ट उच्च शिक्षित झाले आहेत. शिक्षणाने आमच्या कुटुंबात क्रांती घडवून आणली. नांदेडला आलो त्यावेळी फार कोणाची ओळख नव्हती अकाऊंटच्या निमित्ताने सदाशिवराव पाटील यांचा संपर्क झाला आणि पुढे ते माझे सामाजिक आणि राजकीय कार्यातले गुरु बनले. राजकीय आणि सामाजिक कार्य करीत असतांना अनेकांनी मला मोठ्या विश्वासाने भरभरुन साथ दिली त्यामुळेच काही करता आले. मी आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरप्रांतीय विवाह केला. माझी सहचरणी कुंजम्मा काब्देंनी माझा संसार व्यवस्थीत सांभाळल्याने मला समाजकार्य करण्यास प्रेरणा मिळाली. हे सांगतांना त्यांचा कंठ दाटून आला होता यावेळी सत्काराला उत्तर देतांना प्रा. अशोक सिद्धेवाड यांनी समाजवादी समाजरचना निर्माण करण्यासाठी सेवानिवृत्तीनंतर आणखी खूप कार्य करायचे आहे असा मनोदय व्यक्त केला. अध्यक्षीय समारोपात माजी आ. पंडीतराव देशमुख म्हणाले की, डॉ. काब्दे यांचे वैद्यकीय आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठे योगदान आहे. खासदार असतांना त्यांनी लोकसभेत मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विशाल पतंगे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा. विजयानंद कदम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. विकास सुकाळे यांनी केले. यावेळी दीपनाथ पत्की, फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पाटील, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्रफुल्ल अग्रवाल, स. नौनिहालसिंघ जहागिरदार, अॅड. चिरंजीलाल दागडीया, अॅड. कॉ. प्रदीप नागापूरकर, प्रा. बालाजी कोम्पलवार, प्रा. कपिल धुतमल, प्राचार्य एल. पी. शिंदे, प्रभारी प्राचार्य शिवानंद भानेगावकर, प्रा. राजेश सोनकांबळे, प्रा. डॉ. गौतम दुथडे, प्रा. डॉ. सचिन पवार, राहुल गवारे, प्रा. अरुणा शुक्ला, डॉ. पुष्पा कोकीळ, डी. यु. गवई, सेवानिवृत्त सनदी अधिकारी शशिमोहन नंदा, सीए रवी भारतीया, बी. एन. मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यंवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 527 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ६० रुपयांची झळ: घरगुती गॅस महाग ; स्वयंपाकघरात महागाईची जळजळ! महिलांनी स्वतःच्या हक्कांबाबत जागरुक राहणे गरजेचे