समाजकल्याण योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दाखवली चित्ररथाला हिरवी झेंडी

नांदेड – समाजकल्याण विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एलईडी चित्ररथाद्वारे  जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेच्या चित्ररथाला आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमास प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, उपसंपादक अलका पाटील, लेखा लिपीक अनिल चव्हाण उपस्थित होते.

हा चित्ररथ जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन समाज कल्याण विभागाच्या  योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणार असून  लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!