नांदेड (प्रतिनिधी) – वजीराबाद परिसरातील एका कपड्यांच्या दुकानात जाऊन व्यापाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करून खंडणीची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास वजीराबाद येथील संजय फॅशन या दुकानात ही घटना घडली. आरोपी रजोतसिंग आनंद उर्फ मुंबईवाले (रा. नांदेड) याने फिर्यादीच्या दुकानातून विकत घेतलेल्या साहित्याचे ४,९०० रुपयांचे बिल मागितले असता, पैसे मागायचे नाहीत, हा हप्ता आहे असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच जवळील तलवारीच्या मुठीने हातावर मुक्का मारून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वैभव दीपकराव पेंडलवार (वय २७, व्यवसाय – व्यापार, रा. जुना कोठा, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वजीराबाद पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा क्र. ९९/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८(२), ३०८(४), ११८(१), ३५२, ११५(२), ३५१(२) तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (सुधारणा) २०२३ अंतर्गत कलम ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजू वटणे हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,642 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation देगाव येथे बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणात पोलिसांवर धक्काबुक्की; चौघांविरुद्ध गुन्हा ओळखीच्या व्यक्तीकडून मारहाण करून १५ हजार रुपये लुटल्याची घटना