सेनगाव,(प्रतिनिधी)- कुटूंबातील जेष्ठ व्यक्तिंची सेवा, त्यांचा आदर व देखभाल करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्यकर्तव्य आहे असे प्रतिपादन सेनगाव जिल्हा हिंगोली येथे स्व. गंगाबाई जानकीलाल तोष्णीवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत डॉ अर्चना बजाज, नांदेड यांनी केले.
सेनगाव येथील तोष्णीवाल कुटूंबाच्या वतीने मातोश्री गंगाबाई जानकीलाल तोष्णीवाल यांच्या स्मृतीत व्याख्यानमाला श्री बालाजी मंदीर, सेनगाव जिल्हा हिंगोली येथे आभोजित करण्यात आली होती. आपल्या व्याख्यानात डॉ अर्चना बजाज यांनी नवोदित मातापित्यांना तसेच युवक युवतींना आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचे आव्हान केले. टिव्ही, मोबाईल व व्हॉटसअॅप चे मर्यादित वापर करून वेळेची बचत करावी, लहान मुलांना गोड खादयपदार्था पासुन दुर ठेवुन मैदानी खेळाकरिता प्रोत्साहित करावे असे सांगितले.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे संघटनमंत्री अँड.चिरंजीलाल दागडिया यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्व. गंगाबाई तोष्णीवाल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करूण द्वीप प्रज्वलीत करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन ब्रिजगोपाल तोष्णीवाल जिंतुर, नितीन भुतडा भा ज पा अध्यक्ष यवतमाळ, बंकटलाल गटट्राणी वसमत, नंदकिशोर तोष्णीवाल कळमनुरी, व्दारकादास साबु नांदेड, कमलकिशोर दरक वसमत, व्दारकादास सारडा, बद्रीनारायन सारडा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात समाज बांधवाची प्रचंड प्रमाणात उपस्थिती होती. तोष्णीवाल कुटूंबाच्या वतीने या प्रसंगी ओंकारनाथ मालपाणी, महेश सेवा निधीस १०१०००/- रूपयाचा निधी ब्रिजगोपाल तोष्णीवाल कार्याध्यक्ष महेश सेवा निधी यांना सुर्युद करण्यात आला.
स्नेहभोजना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा. तोष्णीवाल यांनी केले. या समाज प्रबोधन कार्य व व्याख्यानमाले बदद्ल तोष्णीवाल कुटूंबियांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.