जवळा येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची 128 वी जयंती उत्साहात साजरी
लोहा – त्यागमूर्ती माता रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी आपली मुले घडवावीत असे प्रतिपादन नांदेड आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रमाधिकारी राहुल आत्राम यांनी माता रमाई यांच्या 128 व्या जयंती कार्यक्रमामध्ये अध्यक्ष पदावरून बोलताना केले. लोहा तालुक्यातील जवळा येथे त्याग, सहनशीलता, समता आणि समाजसेवेचे प्रतीक असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विचार मंचवार प्रमुख पाहुणे म्हणून सोनखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, माता रमाई जयती मंडळाच्या अध्यक्षा भारतबाई निखाते, उपाध्यक्षा करुणाबाई गच्चे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक सुभाष खाडे, ख्यातनाम पत्रकार राजेश्वर कांबळे, जवळा (दे) चे पोलीस पाटील नितीन गवळी, माजी सरपंच साहेब शिखरे,माजी ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद मोरे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश शिखरे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या प्रतिमेस मान्यवारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
पुढे बोलताना राहुल आत्राम म्हणाले की, माता रमाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही समाजहिताचा विचार कधीच सोडला नाही. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक लढ्याला मोलाची साथ दिली. त्यांचा त्याग, संयम आणि कर्तव्यनिष्ठा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. सुशिक्षित व सुसंस्कृत पिढी घडवण्यात महिलांची भूमिका निर्णायक आहे समाजातील महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, शिक्षणाला प्राधान्य द्यावे आणि सामाजिक परिवर्तनात सक्रिय सहभाग घ्यावा, स्त्रीसक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक समतेचा संदेश या माध्यमातून कार्यक्रमाधिकारी आत्राम यांनी दिला.
कार्क्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार भैय्यासाहेब गोडबोले यांनी केले, प्रास्ताविक आकाशवाणीचे प्रासंगिक उदघोषक आनंद गोडबोले तर सर्वांचे आभार सुरेश गोडबोले यांनी मानले. या कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी 4 वाजता माता रमाई यांच्या भव्य तैल चित्राची मिरवणूक जवळा गावातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली. या कार्यक्रमाला गावातील महिला, पुरुष, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कैलास गोडबोले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष भीमराव गोडबोले, भारतीय बौद्ध महासभेचे शाखाध्यक्ष सुरेश गोडबोले, मिलिंद गोडबोले, प्रकाश गोडबोले, शंकर,गच्चे, किशन गच्चे, किशन गोडबोले, मुकुंद गोडबोले, विलास गोडबोले, वसंत हिंगोले, वच्छलाबाई गोडबोले, सुंदरबाई गोडबोल, माया गोडबोले, दत्ता गोडबोले, अन्नाराव गच्चे, मारोती गोडबोले, चांदु झिंझाडे, भीमराव हिरामण गोडबोले, अरविंद गोडबोले, अतुल गोडबोले, बालचंद गोडबोले,भीमराव लोखंडे, तुकाराम कांबळे, गणेश कांबळे, संजय कांबळे, राजेश गच्चे,रमेश गोडबोले, समता सैनिक दलाचे गुणवंत गच्चे, साहेब गच्चे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
माता रमाई गणगोत पुरस्काराचे थाटात वितरण
दरवर्षी जवळा ग्रामस्थाच्यावतीने 7 मातांना मातांना रमाई गणगोत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते या वर्षीही पूज्य भंते बौद्धीधम्मो यांच्या आई सरस्वतीबाई पोवळे (वसरणी, नांदेड), ख्यातनाम पत्रकार राजेश्वर कांबळे यांची आई निर्मलाबाई कांबळे (कंधार), सुनिता डोंगरे (उमरी), सुकांता वागरे, समता सैनिक दैवशाला मस्के (माळाकोळी), लक्ष्मीबाई जमराज (पिंपरण), जिजाबाई गोडबोले (बळीरामपूर, नांदेड) या मातांना माता रमाई गणगोत पुरस्कार देऊन मान्यरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

भारतीय संविधानाचे अंकुश शिखरे यांच्याकडून वाटप
भारतीय संविधानाची ओळख सर्वसामान्य जनतेला व्हावी आणि घराघरात संविधान वाचले जावे म्हणून ‘ हरघर संविधान, घरघर संविधान या उपक्रमांतर्गत सामाजिक कार्यकर्ते अंकुश शिखरे यांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित महिला – पुरुष, युवकांना भारतीय संविधानाच्या शेकडो प्रतीचे वाटप करुन हे संविधान घेवून घरी ठेवू नका तर प्रत्येकाने वाचा असा त्यांनी अग्रह केला.
