नांदेड – मग्रारोहयोअंतर्गत रेशीम विकास योजना रेशीम संचालनालयासह, कृषी विभाग व ग्रामविकास विभागामार्फत संयुक्तपणे राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी नवीन तुती लागवड नोंदणीसाठी तालुका कृषी कार्यालय व तालुका पंचायत समिती कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी पी.बी.नरवाडे यांनी केले आहे. सन 2025-26 मध्ये समुहाने मनरेगा, सिल्क समग्र-2 व पोकरा योजनेअंतर्गत तसेच वैयक्तीक नवीन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महा-रेशीम अभियान 2026 दिनांक 4 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. तरी नवीन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय रामाकृष्णा इमारत, दुसरा मजला, एम एफ होंडा शोरुमच्या बाजूला, जॉन डिअर ट्रक्टर सर्व्हिस सेंटरच्या समोर हिंगोली रोड, नांदेड दूरध्वनी-9561714145, 7798213333, 9763347777, 8625044438, 7219023328 येथे संपर्क करावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी पी.बी.नरवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 787 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नेरली येथील ‘नंदनवन कुष्ठधाम’ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची भेट ; कुष्ठरुग्णांना साहित्य व खाऊचे वाटप ७७ वर्षांत प्रथमच — लोकसभा सभापतींच्या खुर्चीवर अविश्वासाची तलवार