नांदेड(प्रतिनिधी) -इंदिरानगर बिलोली येथे चोरट्यांनी घरफोडून 62 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
बागनटाकळी देगलूर येथे चार जणांनी मारहाण करून 50 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे. इंदिरानगर बिलोली येथील पिराजी शिवराम आंबेराव यांच्या तक्रारीनुसार 2 फेबु्रवारीच्या सकाळी 10.30 ते 3 फेबु्रवारीच्या पहाटे 5 वाजेदरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटात असलेले 62 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरू नेले आहेत. बिलोली पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 13/2026 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक तिडके अधिक तपास करीत आहेत.
मोहम्मद अब्बास मुजावर रा.जांब मा.मुखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 फेबु्रवारी रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास बागनटाकळी समोर देगलूर येथे हनमंत अंगदराव मामीलवाड, मंथन पर्बते, राजेंद्र अंगद गंगनर तिघे रा.देगलूर आणि रणजित पाटील रा.नायगाव यांनी त्यांची गाडी आडवून शिवीगाळ करून लोखंडी काठीने मारहाण केली आणि त्यांच्या जवळचे 50 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. देगलूर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 56/2026 दाखल केला असून पोलीस उपनिक्षिक सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
बिलोली येथे घरफोडले; देगलूरात जबरी चोरी
