नांदेड (प्रतिनिधी)- सदरील घटना किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ येथे घडली आहे.रेड्डी समाजातील भास्कर नागन्ना गड्डम ( चोटपल्ली) व विनोद भास्कर गड्डम हे 2 इसम आप्पारावपेठ येथील रहिवाशी असून त्याच्या समाजातील रेड्डी समाजाने जात पंचायत करून दोन कुटुंबांना बहिष्कृत करण्यात आले.
भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत आले तरी एखाद्या समाजाला जात पंचायत करून बहिष्कृत करण्याची प्रथा पहावयास मिळत आहे. तसेच गावात दुकान,पाणी,दूध बंदी आणि शेतातील शेतमजूर मिळू न देणे, शेतीच्या कामासाठी कुणीही जाऊ नये व नांगरणी साठी ट्रॅक्टर ला पण बंदी घालणे. त्या 2 कुटुंबांच्या मदतीसाठी कोणीही पुढे आल्यास त्या व्यक्तीस 15 हजार रूपये चा दंड जात पंचायतीने ठेवला आहे. भास्कर नागन्ना गड्डम ( चोटपल्ली) या कुटुंबीयांकडे 12 एकर जमीन असून ती जमीन आजपर्यंत पडीत आहे कारण यांच्या कामासाठी कोणताही रोजदार जाऊ नये असा जात पंचायतीचा ठराव आहे व गावातील समाजातील व इतर समाजातील कोणत्याही व्यक्तीने या कुटुंबीयांना बोलू नये व बोलल्यास 15 हजार रूपये दंड ठेवण्यात आला आहे. व एवढेच नव्हे तर भास्कर गड्डम ने त्याच्या शेतात सोयाबीन पेरले असता ते काढण्यासाठी मळणी यंत्र आले असता त्यास 15 हजार रूपये दंड जात पंचायतीने लावला आहे त्यामुळे सोयाबीनचे ढीग आजही त्याच जागी कुजत आहे.ही कुठली संस्कृती आहे हिंदू समाजाने हिंदू समाजावरच बहिष्कार टाकावा असे दबक्या आवाजात चर्चा ऐकावयास मिळत आहे.ही प्रथा 1978 च्या अगोदर ऐकावयास मिळत होती आज 2026 उजाडले तरी ही प्रथेचे रूप आज त्या कुटुंबीयांना अनुभवास मिळत आहे.दोन्हीही रेड्डी समाज असताना देखील समाजानेच समाजाला वाळीत टाकावे हे किती दिवस चालणार.

मनुस्मृती च्या काळात असेच बहुजन वर्गावर अन्याय अत्याचार होत होते तेव्हा या बहुजन वर्गासाठी महात्मा ज्योतिबा फूले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुढे आले होते पण आता 2026 उजाडले तरी ही असे प्रकार घडत असतील तर त्यास कोण जबाबदार आहे आणि या परिस्थितीला प्रशासनाने कायद्यात उचित न्याय मिळवून द्यावा व या कुटुंबीयांना मिळत असलेल्या दुजाभावाच्या वागणुकीला कुठे तरी थांबवावे. जे काम महात्मा फुलेंनी त्या काळात त्यांची स्वतःची विहीर पूर्ण अस्पृश्य समाजासाठी खुली करून समजात एक मोठे उदाहरण प्रस्थापित केले होते ते आज या समाजा साठी कुणी महात्मा फुले तर होऊ शकत नाही. पण प्रशासनाने जर यात लक्ष देऊन त्यांची ही दुजाभावाची वागणूक थांबवली तर तेच त्यांच्या जीवन जगण्यासाठी त्या कुटुंबांना आधाराचे काम करेल.
कारण आता त्या पीडित कुटुंबीयांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना असे सांगितले आहे की आमच्या गावात जगून काही फायदा नाही कारण आमच्याच समाजाने आम्हाला वाळीत टाकले हा कुठला न्याय आहे कुठले संस्कार आहेत आणि कुठले हिंदुत्व आहे हे असे जगण्यापेक्षा मेलेले बरे.कारण आम्ही सर्व कुटुंबीयांनी सदरील प्रकार इस्लापूर पोलीस स्टेशन येथे ठाणेदार व किनवट येतील डीएसपी साहेबास माहिती दिली तरी आम्हाला अद्याप न्याय मिळाला नाही. व पुढे आम्ही सर्व कुटुंबीय नांदेड येथील एसपी व जिल्हाधिकारी साहेबांकडे जाऊन न्याय मागू व ते तरी आम्हाला न्याय मिळवून देतील का हे त्या कुटुंबीयांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
भारतीय संविधान लागू झाले तेव्हा जात संपली होती जातीच्या पंचायतीचा निर्णय पण संपला होता पारधी समाजामध्ये ही जात पंचायत भारतातील तीन जागी होत होती त्यातील एक जागा नांदेड जिल्ह्यातील मालेगाव आहे. पण सध्या तेथे सुद्धा जात पंचायत बंद झाली आहे परंतु इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपारावपेठ मध्ये आलेला हा प्रसंग एक नवीन प्रश्न समाजासमोर तयार करत आहेत ज्यातून कायदा मोठा की जात पंचायत मोठी हा प्रश्न उपस्थित झाला आहे.