शीख बांधवांची अखंड लंगर सेवा…

         निस्वार्थ सेवा आणि एकाच देवाची उपासना सामाजिक सेवेत समुदायाचा सहभाग या सुत्रांनी समाज उभारणी करून श्री गुरू नानक देव यांनी शीख धर्माची स्थापना केली. धर्म पुढे नेताना मुगल सम्राट औरंगजेब याचा काळ आला त्यावेळी धर्माची धुरा श्री गुरू तेग बहादूर साहेब यांच्याकडे आलेली होती.

        कश्मीरी पंडितांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायावर तोडगा काढावा यासाठी बलिदान देण्याची तयारी श्री गुरू तेग बहादूर यांनी दाखवली व त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. त्यामुळे मुगल सैन्याचा त्रास कमी झाला. त्यामुळे श्री गुरू तेग बहादूर यांना हिंद दी चादर म्हंटले जाते. आपला धर्म सर्वसमावेशक अर्थात समाजातील सर्व घटकांना सामावणारा बनविण्याचे मोठे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. त्यांनी इ.स.1621 ला जन्म झालेल्या श्री गुरू तेग बहादूर यांनी 1675 साली सर्वोच्च बलिदान दिले.

        त्यांच्या बलिदानानंतर त्यांचे पुत्र श्री गुरू गोविंदसिंह हे दक्षिणेत आले आणि नांदेड येथे अखेरपर्यंत निवास केला. कोणतीही व्यक्ती यापुढे गुरूपदी येणार नाही तर श्री गुरू ग्रंथ साहिब हे यापुढे गुरू असे जाहिर केले. त्यानंतर एक  ईश्वर   अर्थात ओंकार आणि गुरू ग्रंथ साहेब याचीच पूजा शीख धर्मात होते.श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमाचा मोठा कार्यक्रम या निमित्ताने नांदेड येथे 24 व 25 जानेवारी, 2026 या काळात होणार आहे. याच्या आयोजनात महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे.

        शीख समाजाची उभारणी सामुदायिक आणि निस्वार्थ सेवा कार्यावर आधारित आहे. यामध्ये लंगर सेवा, गुरूद्वारा सेवा, शिक्षण व युवा विकास तसेच आपत्तीच्या काळात मदत यांचा प्रामुख्याने समावेश आहे. लंगर सेवा खऱ्या अर्थाने वेगळ्या प्रकारची सेवा आहे. एकता, समानता योच दर्शन आपण होईल प्रत्येक व्यक्ती स्वयंसेवक होवून जेवण बनविण्यापासून ते सर्वांना मोफत देण्याचे काम होते. अगदी भांडी स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवक होण्यासाठीही सर्व जण पुढाकार घेतात.

        अमृतसर येथील श्री हरिमंदीर अर्थात सूवर्ण मंदीर येथे 24 तास कोणताही खंड न पडू देता ही लंगर सेवा चालते. या ठिकाणी जगभरातील शीख धर्मिय तसेच इतर धर्माचेही लाखो भाविक, पर्यटक येत असतात. येथे कोणताही जात, धर्म याच्या पलिकडे जाण्यायेणाऱ्या प्रत्येकास ही लंगर सेवा उपलब्ध आहे.   गुरूद्वारा हुजूर साहिब अर्थात नांदेड येथे गुरूद्वारा ते सुवर्ण मंदीर अशी थेट रेल्वे सेवा सुरू झालेली आहे. ही रेल्वे नांदेड स्थानकातून निघण्यापूर्वी रेल्वेतील प्रत्येक प्रवाशाला लंगर प्रसाद शीख बांधव पूरवित आहे. या रेल्वेच्या मार्गावर थेट अमृतसर पर्यंत दुपारचे तसेच रात्रीचे जेवण या स्वरूपात लंगर प्रसाद दिला जातो. असे असणारी ही भारतातील एकमेव रेल्वे आहे.

        श्री गुरू तेग बहादूर यांचा 350 वा शहिदी समारंभ याच नांदेड नगरीत होणार आहे हे इथे विशेष.

– प्रशांत दैठणकर

9823199460

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!