नांदेड(प्रतिनिधी)-2026 या नवीन वर्षात स्थानिक गुन्हा शाखेच्या एका पोलीस अंमलदाराला उमरी तालुक्यातील पती-पत्नीने चोप दिल्याची घटना घडली आहे. या संदर्भाने उमरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 नुसार पती-पत्नीविरुध्द अदखल पात्र गुन्ह्याची नोंद सुध्दा झाली आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलामध्ये स्थानिक गुन्हा शाखा आहे. स्थानिक गुन्हा शाखेला जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचा अधिकार सुध्दा असतो. तसेच अवैध धंदे, जुगार, मटका, वाळू, अवैध दारु, विक्रींवर लक्ष ठेवून त्यांना त्याच्या पासून प्रतिबंध कसे करता येईल यासाठी प्रयत्न करायचे असतात. या कामकाजात सुविधा व्हावी म्हणून नांदेड जिल्ह्यातील 10 उपविभागात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी, नियुक्त केले जातात. तसेच नांदेड जिल्ह्यातील 36 पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रांमध्ये ते पोलीस ठाणे बीट म्हणून पोलीस अंमलदारांना वाटले जाते. जेणे करून काम करण्यात सुविधा व्हावी.
स्थानिक गुन्हा शाखेतील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी कोणत्याही कामासाठी, तपासणीसाठी, कार्यवाही करण्यासाठी जाणार असेल तर त्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेत डायरी आहे. त्या डायरीवर ज्या व्यक्तीकडे, ज्या ठिकाणी, ज्या गावात जायचे आहे त्याची नोंद केली जाते. पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी आठवडाभरात केलेल्या कामासाठी आठवडा डायरी लिहायची असते. पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार यांनी पेट्रोल बुक लिहायचे असते आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांनी नोट बुक लिहायचे असते. ज्यामध्ये आपण दररोज काय काम केले आहे. त्याची नोंद त्यांनी करायची असते. आता नांदेड जिल्ह्यातील किती पोलीस अंमलदार पेट्रोल बुक आणि नोटबुक लिहितात हे देवच जाणे.
प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार दि.3 जानेवारी 2026 रोजी उमरी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हा शाखेतील ज्या पोलीस अंमलदाराकडे आहे. तो पोलीस अंमलदार एकटाच कळगाव तांडा ता.उमरी येथे गेला. तेथे त्याने कैलाश गणेश चव्हाण यांचे घर तपासणीसाठी प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही आणि कैलास गणेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सुमनबाई यांनी त्या पोलीस अंमलदारासोबत चोपा-चोपीचा प्रकार केला असेे सांगितले जाते. त्यानंतर उमरी पोलीस तेथे पोहचले घटनेचा आणि तपासणीचा पंचनामा निल आहे. परंतू पुढे काही भानगड होईल म्हणून कैलास गणेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सुमनबाई विरुध्द कलम 110/117 प्रमाणे अ दखल पात्र गुन्हा क्रमांक 1/2026 दाखल करण्यात आला. या तक्रारीमध्ये पंचनामा करून परत येतांना पती-पत्नीने उधट वर्तन केल्याचे आहे.
सध्या स्थानिक गुन्हा शाखेत नसतांना सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेतच काम करणारा पोलीस अंमलदार देविदास चव्हाण याने कळगाव तांडत्त येथे गेलेल्या आपल्या सहकारी पोलीसाला मार्गदर्शन करण्याची गरज होती. कारण कळगाव तांड्यातील चव्हाण आणि पोलीस अंमलदार चव्हाण एक दुसऱ्यांना ओळखत असतीलच ना. त्यामुळे तेथे घडलेला प्रकार टळला असता.
नवीन वर्षाच्या सुरूवातीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अंमलदाराला चोप; उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना
