नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान गुरूवार 15 जानेवारी 2026 रोजी तर मतमोजणी शुक्रवार 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. याअनुषंगाने गुरूवार 15 जानेवारी रोजी सिडको / हडको परिसर नांदेड व शुक्रवार 16 जानेवारी गांधी मैदान गोकुळनगर नांदेड येथील भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये निर्गमीत केला आहे. या आदेशात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड क्षेत्रात भरणारे वरील आठवडी बाजार हे शनिवार 17 जानेवारी 2026 रोजी भरविण्यात यावेत, असे नमूद केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 668 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सिडको नांदेड येथून 14 वर्षीय बालक हरवला आहे;जनतेने त्याच्या शोधासाठी मदत करावी आख़िर वोट दें तो किसे दें…?