नांदेड – नांदेड ते हिंगोली जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खडकूतपाटी ते जांभरुनफाटा दरम्यानचा रस्ता येत्या 2 ते 4 जानेवारी पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. यासाठी पर्यायी मार्ग जाण्या-येण्यासाठी नांदेड ते हिंगोली जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खडकूत पाटी ते जांभरुन फाटा दरम्यानचा रस्त्याच्यापलिकडे एकेरी मार्ग असा राहील.
मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबधीत विभागाने पुढील उपाययोजना करुन 2 जानेवारी 2026 रोजीचे 6 वा. पासून ते 4 जानेवारी 2026 रोजीच्या 10 वा. पर्यंत उक्त नमुद केल्याप्रमाणे नांदेड ते हिंगोली जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खडकूत पाटी ते जांभरुन फाटा या दरम्यानची सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पलिकडच्या एकेरी मार्गाने वळविण्यास अधिसुचनेद्वारे मान्यता दिली आहे.
पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण यांनी प्रस्तुत अधिसुचना प्रचार व प्रसारसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण /कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड/ प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पीआययू नांदेड यांनी रस्ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही करावी, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.
