नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरिक रत्नाबाई दशरथराव कळसे (वय ९८) यांचे दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. बाबुराव कळसे यांच्या मातोश्री तर बजरंग दलाचे पदाधिकारी अमित कळसे, कवयित्री सुवर्णा कळसे यांच्या त्या आजी होत. रत्नाबाई कळसे या अन्नपूर्णामाता म्हणून नजिकच्या वर्तुळात परिचित होत्या. Kanthak Suryatal Post Views: 764 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एआय टुल्सचा वापर करतांना त्याला काय मागायचे आहे यासाठी मात्र माणुसच लागतो परीक्षा कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही-जिल्हाधिकारी