नांदेड (प्रतिनिधी) – खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना फरार झालेल्या आरोपीस तब्बल चार वर्षांनंतर बिलोली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई 18 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन बिलोली येथे गुन्हा क्रमांक 337/2024, कलम 224 भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल होता. आरोपी संजय मोतीराम चव्हाण (वय 43 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. राजोळी गल्ली, देगलूर, जि. नांदेड) हा यापूर्वी गुन्हा क्रमांक 05/2001 कलम 307, 452 भादंवि अंतर्गत शिक्षा भोगत असताना छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहातून पोलिस अभिरक्षेतून पळून गेला होता. त्यानंतर तो सतत फरार होता. या प्रकरणी फिर्याद मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. अखेर 18 फेब्रुवारी 2026 रोजी गुप्त माहितीच्या आधारे बिलोली पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, बिलोलीचे पोलीस उपाधीक्षक शाम पानगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व पोलीस पथकाने केली. या कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,254 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रंगभरण चित्रकला स्पर्धेतून शिवरायांना अभिवादन परीक्षा कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही-जिल्हाधिकारी