नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड रेल्वे पोलीसांच्या हद्दीत असणाऱ्या पुर्णा रेल्वे स्थानकावर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या चोरी प्रकरणात त्यांचाच पोलीसाचा सहभाग असल्याचे पुरावे रेल्वे पोलीसांनी शोधले. न्यायालयाने त्या चोरी प्रकरणातील पोलीसाची जामीन 10 नोव्हेंबर रोजी रद्द केली. पण अद्याप तो सापडला नाही. विशेष म्हजणे त्याच्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला रेल्वे पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सलग्न करण्यात आले होते. मग न्यायालयाचा निकाल आला तेंव्हाच त्याला तेथे का अटक झाली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
7 ऑक्टोबर रोजी कोल्हापुर-नागपूर रेल्वे गाडीच्या वातानुकूलीत प्रवास करणाऱ्या प्रवाशी गणेश राठी यांच्या पत्नीची बॅग पुर्णा रेल्वे स्थानकावर चोरीला गेली. त्यात 14 लाख 100 रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणात पोलीसांनी बाळू गणपत गव्हाणे या चोराला अटक केली. त्याने 7 लाख 52 हजार 984 रुपयांचा चोरलेला ऐवज पोलीसंाना काढून दिला. या तपसादरम्यान रेल्वे पोलीसांच्या लक्षात आले की, ही चोरी प्रत्यक्षात येण्यामागे त्यांच्याच पोलीस ठाण्यातील पोलीस अक्षय मोरचुले बकल नंबर 441 चा सहभाग आहे. रेल्वे पोलीसांनी उत्कृष्ट काम केले होते. कारण त्यांना काही जादुगराप्रमाणे ही माहिती कळली नव्हती. पण पुर्णा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर बाळू गव्हाणे आणि पोलीस अक्षय मोरचुले हे सोबत फिरतांना दिसत होते. सोबतच पोलीस अक्षय मोरचुलेनेच वातानुकूलीत कक्षाचे बंद दार उघडून चोरटा बाळू गव्हाणेला आत घेतले होते. विशेष म्हणजे 1 ऑक्टोबर पासूनच अक्षय मोरचुलेची ड्युटी नागपूर येथील धम्म परिषदेसाठी लावलेली होती. पण तो तेथे गेलाच नव्हता. नागपूर पोलीस अधिक्षकांनी याबाबतचे पत्र लोह मार्ग पोलीस अधिक्षक छत्रपती संभाजीनगर यांन पाठविले होते.
त्यानंतर नांदेड लोहमार्ग पोलीसांनी अक्षय मोरचुलेला अटक केली. पण न्यायालयाने त्याला नोटीस देवून जामीन दिला होता. या संदर्भाने प्रकरणाचे तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिलकुमार जोगदंड यांनी न्यायालयाला पुर्ननिरिक्षणाचा अर्ज दिला. त्यात या प्रकरणाचे फिर्यादी गणेश राठी यांनी ऍड. डी.के.हंडे यांनी सुध्दा न्यायालयासमक्ष पोलीस अक्षय मोरचुलेला पोलीस कोठडी दिली तरच गणेश राठी यांचा चोरी गेलेला ऐवज पुन्हा सापडेल असे सांगितले होते. न्यायालयाने 10 नोव्हेंबर रोजी हा पुर्ननिरिक्षणाचा अर्ज निकाली काढून त्यात अक्षय मोरचुलेला दिलेला जामीन रद्द केला होता आणि तपासीक अंमलदाराला त्याला अटक करण्याची मुभा दिली होती.
पण आज पर्यंत तरी अक्षय मोरचुलेला अटक झाली नाही. विशेष म्हणजे त्याचे नाव चोरीच्या गुन्ह्यात आल्यानंतर त्याला अटक झाली आणि न्यायालयाने जामीन दिला. तेंव्हा पासून त्याला लोहमार्ग पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सलग्न करण्यात आले होते. पण तेथून सुध्दा तो न्यायालयाच्या आदेशानंतर तो गायब झाला आणि अद्याप सापडला नाही. यामागचे गमक काय असेल? म्हणूनच म्हणतात पोलीस खाते करील ते होईल.
संबंधीत बातमी….
चोरीच्या गुन्ह्यातीली आरोपी पोलीस लोहमार्ग पोलीसांना सापडेना
