नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील पोलीस ठाणे वजिराबादच्या हद्दीत असणाऱ्या वाघी रोड परिसरातील समीराबागमध्ये सोमवारी एका घरात घुसून अज्ञात महिलेने लाखोंचा ऐवज चोरला आहे.
समीराबागमध्ये राहणारे नसीम बेग मुसा बेग मिर्झा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांच्या घराच्या उघड्या दरवाज्याचा फायदा घेवून कोणी तरी अनोळखी महिला घरात घुसली आणि कपाटात ठेवलेले 3 लाख 8 हजार 200 रुपयांचा सोन्याच्या दागिण्यांचा ऐवज चोरुन नेला आहे. वजिराबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 471/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक गुटे अधिक तपास करीत आहेत.
समीरा बाग भागात 3 लाखांच्या सोन्याच्या दागिण्यांची चोरी
